
Aaditya Thackeray On CM Eknath Shinde | आता नवरात्रीत 450 मंडळाचा रेकॉर्ड, गरागरा गरागरा फिरायचेय…; CM शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरेंची जाहीर भाषणात फटकेबाजी
रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – Aaditya Thackeray On CM Eknath Shinde | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पासंदर्भातील पाठपुरावा उद्योग खात्याने आणि मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर केला पाहिजे. पण मुख्यमंत्र्यांना आता नवरात्रीमध्ये दांडीया आणि गरब्यासाठी जायचे असेल तर काम मागे राहतील. मुख्यमंत्री शिंदे नवरात्रीमध्ये मंडळ फिरण्याचा विक्रम करतील, अशी चौफेर फटकेबाजी करत शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे टोला लगावला. ते आज रत्नागिरीत एका सभेत बोलत होते. (Aaditya Thackeray On CM Eknath Shinde)
आदित्य ठाकरे म्हणाले, उद्योग खाते असेल किंवा मुख्यमंत्री असतील लवकर पाठपुरावा केला पाहिजे. कारण आता नवरात्री येणार आहे तर मुख्यमंत्री मोहोदयांना दांडिया, गरबा फिरायचे असेल. सध्या त्यांचा रेकॉर्ड आहे. 250 मंडळ तरी फिरले असतील. आता 450 मंडळ. स्वत:च्या नावाने वर्ल्डबूकमध्ये रेकॉर्ड करायचा आहे. गरागरा.. गरागरा फिरायचे आहे सगळीकडे. थोडे हे बाजूला ठेवले पाहिजे, असा खोचक टोला आदित्य यांनी हातवारे करुन लगावला. (Aaditya Thackeray On CM Eknath Shinde)
मुख्यमंत्री शिंदेंच्या ‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रेवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, काल परवा मी ऐकले की मी यात्रा काढली शिवसंवाद म्हणून त्यांना पण आता यात्रा करायची आहे कुठली तर हिंदू गर्जना यात्रा. ठीक आहे यात्रा करा.
यात्रांना माझा आक्षेप नाही. पण यात्रा काढण्याआधी तुम्ही महाराष्ट्रातील शेतकर्यांना उत्तर देणे गरजेचे आहे.
तुम्ही अजून ओला दुष्काळ जाहीर का नाही केला? ज्या ज्या सवलती आम्ही महाविकास आघाडीकडून देत होतो,
कर्जमुक्त करत होतो शेतकर्यांना ते तुम्ही अजून का नाही केले, याचेही उत्तर मुख्यमंत्र्यांनी शेतकर्यांना दिले पाहिजे.
आदित्य ठाकरे म्हणाले, ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जात आहात तिथल्या तरुणांना उत्तर द्या की जो रोजगार या महाराष्ट्रात येणार होता
तो तुम्ही का नाही आणू शकला, हे उत्तर द्या. डबल इंजिनमध्ये एक इंजिन फेल का झाले आहे? हे उत्तर द्या.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर टीका करताना आदित्य म्हणाले, आज महाराष्ट्राची हालत कशी आहे बघा.
उद्योगमंत्र्यांना माहिती नाही की महाराष्ट्रात काय चालले आहे. महाराष्ट्रात किती उद्योग आहेत.
किती उद्योग मागच्या सरकारने आणलेत आणि किती या सरकारमुळे पळून गेलेत, हे या उद्योग मंत्र्यांना माहिती नाही.
Web Title :- Aaditya Thackeray On CM Eknath Shinde | Shivsena aditya thackeray slams cm eknath shinde says he will create record of visiting pandal during navratri
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Ramdas Athawale | ‘मनसेचा भाजप आघाडीला कोणताच फायदा नाही’ – रामदास आठवले