Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | देवेंद्र फडणवीसांची CAA कायद्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका, ”बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा…”

मुंबई : Devendra Fadnavis On Uddhav Thackeray | बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांनी आता हिंदुत्व सोडले आहे. ते कॉंग्रेस सोबत गेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचे काय मत आहे ते स्पष्ट करावे. बाळ ठाकरेंचा मुलगा सीएएला कसा विरोध करू शकतो? उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला आहे. बाळ ठाकरे यांचा मुलगा हे करू शकतो हे समजणे मला अवघड जात आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी सीएए कायद्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली होती. या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.(Devendra Fadnavis On Uddhav Thackeray)

फडणवीस म्हणाले, सीएए कायदा तीन देशांमधील नागरिकांसाठी आहे. ज्यांच्यावर त्यांच्या देशात अत्याचार होत आहे म्हणू ते भारतात परत आले आहेत अशा व्यक्तींसाठीच हा कायदा आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सीएए कायदा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशामध्ये काही जातींवर
अन्याय होत होता. यात हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन यांचा समावेश आहे.
त्या समुदायांना भारतात सुरक्षित आश्रय देण्यासाठी आहे. त्यांना भारतीय नागरिकत्व देणारा हा कायदा आहे.
कुणाचे नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही.

ते पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मुंबईत ज्या गोष्टी काही वर्षांपूर्वी करायला हव्या होत्या त्या पूर्ण केल्या.
उद्धव ठाकरे यांना मुंबईतील जनतेने अनेक वेळा संधी दिली. पण, त्यांनी त्यांच्यासाठी काहीही केले नाही.
त्यांच्याकडून शहरात एकही प्रतिष्ठेचे काम झाले नाही. आता ते मतपेटीसाठी राजकारण करत आहेत.

लोकसभा निवडणुकीबाबत फडणवीस म्हणाले, महायुतीचे जागावाटप ८० टक्के पूर्ण झाले आहे.
राष्ट्रवादीच्या जागा अजित पवार तर शिवसेनेच्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोषित करतील.
तर, भाजपच्या काही जागा घोषित झाल्या आहेत. तसेच, या निवडणुकीत गेल्या वेळेपेक्षा भाजपाच्या जागा
वाढलेल्या दिसतील. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या देखील जागा वाढतील.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parkash Ambedkar On Election Commission | महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान कशासाठी? निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार, समन्वय समितीची बारामतीत बैठक