Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार, समन्वय समितीची बारामतीत बैठक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Baramati Lok Sabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या तयारीच्या दृष्टीने महायुतीची समन्वय बैठक उद्या (रविवारी) होणार आहे. शिरूर, बारामती, पुणे लोकसभा क्लस्टर चे प्रमुख व राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता, मोरोपंत नाट्यगृह, नवीन कचेरी रस्ता, समर्थ नगर, बारामती येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) यांनी दिली.(Baramati Lok Sabha Election 2024)

बैठकीसाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय माशिलकर, आमदार राहुल कुल, आमदार दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, राष्ट्रवादीचे नेते रमेशअप्पा थोरात, पी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, बाळासाहेब चांदेरे, गीतांजली ढोणे, भारती पांढरे, जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे, महेश पासलकर, आरपीआय चे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, विक्रम शेलार, सूर्यकांत वाघमारे, तसेच महायुतीतील सहयोगी पक्ष लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम पक्ष, रयत क्रांती संघटना, भीमसेना, पी जे पी, स्वाभिमान, जे. एस. एस, आर एस पी, ब. वि. आ, पी जे पी, राष्ट्रीय स्वराज्य सेना, महाराष्ट्र क्रांती सेना, लहुजी सेना च्या पदाधिकाऱ्यांसह सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी सांगितले.

ह्या बैठकीत लोकसभेच्या प्रचाराचे नियोजन करण्यात येईल असे महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
तसेच बैठकीत लोकसभेच्या प्रचाराचे नियोजन करण्यात येईल असे महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Beed Lok Sabha Election 2024 | पंकजा मुंडेंना बीडमध्ये तगडं आव्हान, शरद पवार देणार ज्योती मेटेंना उमेदवारी?

Katraj Kondhwa Road | अखेर कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने 140 कोटी रुपये निधी दिला; रस्त्याच्या कामाला गती मिळणार