Parkash Ambedkar On Election Commission | महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान कशासाठी? निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, प्रकाश आंबेडकर यांची मागणी

मुंबई : Parkash Ambedkar On Election Commission | देशात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यात ही निवडणूक होणार आहे. ४ जून रोजी निकाल लागेल. तर महाराष्ट्रात प्रथमच तब्बल ५ टप्प्यात लोकसभा निवडणूक घेतली जाणार आहे. यावरून वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या हेतुवर शंका उपस्थित केली आहे. तसेच प्रश्नांचा भडीमार केला आहे.(Parkash Ambedkar On Election Commission)

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील पाच टप्प्यातील निवडणूक कार्यक्रमाला विरोध केला. महाराष्ट्रात ना बर्फ पडत, ना हिंसा होत, मग पाच टप्प्यात मतदान कशासाठी? असा सवाल करत आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, मी १९८४ पासून निवडणूक लढवत आहे. मी आजपर्यंत निवडणूक काळात महाराष्ट्रात कुठेही गडबड झालेली पाहिली नाही. कुठे दंगा झालेला नाही. एवढेच काय राज्यात दगड मारायला माणूसही मिळत नाही.

महाराष्ट्रात कुठेही दळणवळणाची समस्या नाही. कुठेही बर्फ पडत नाही. कुठे पाऊस नाही. मग पाच टप्पे का? राज्यातील दोन टप्प्यात होणाऱ्या निवडणुका पाच टप्प्यात घेण्याचे कारण काय? निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली.

निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमावर शंका उपस्थित करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, शांत महाराष्ट्र हा अशांत
करायला इलेक्शन कमिशन निघाले आहे का? राज्यात दोन टप्प्यात निवडणुका झाल्या पाहिजे हे आमचे म्हणणे आहे.

पहिल्या टप्प्यात २४ जागांसाठी मतदान घ्या आणि दुसऱ्या टप्प्यात २४ जागांसाठी मतदान घ्या.
याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला पत्र पाठवून आमचे म्हणणे मांडणार आहोत, अशी माहिती आंबेडकर यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Beed Lok Sabha Election 2024 | पंकजा मुंडेंना बीडमध्ये तगडं आव्हान, शरद पवार देणार ज्योती मेटेंना उमेदवारी?

Katraj Kondhwa Road | अखेर कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने 140 कोटी रुपये निधी दिला; रस्त्याच्या कामाला गती मिळणार