Devendra Fadnavis | फडणवीसांचा कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना राजकीय सवाल, मुंबईतील मोकाट रेड्यांचा बंदोबस्त कसा करायचा सांगा?

कराड : येथे ४२ लाखांचा बैल आहे. इलेक्ट्रिक बैल आहे. सर्वात छोटी गाय आहे. येथे अनेक गोष्टी पाहण्यास मिळाल्या. फक्त माझी तुम्हाला एकच विनंती, आमच्या मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची काही योजना असेल तर सांगा. ते रेडे इतके टीव्हीवर बोलतात की त्यावर उपायाचे काही तंत्रज्ञान असेल तर ते सांगा, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाषणात ठाकरे गटाला (Thackeray Group) लगावला. ते कराडच्या कृषी प्रदर्शनात (Karad Agricultural Exhibition) बोलत होते.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दररोज शिंदे, भाजपा, राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख शूपर्णखा असा केला होता. यावरून रोज राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. आज कराडच्या कृषी प्रदर्शनात देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता संजय राऊत यांना टोला लगावला. या कृषी प्रदर्शनाला खासदार उदयनराजे भोसले देखील उपस्थित होते.

यावेळी कृषी क्षेत्राचे कौतुक करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृषी आणि उद्योग जेव्हा हातात हात घालून चालतात तेव्हाच शेतकरी समृद्ध होतो. आज या कृषी महोत्सवात मी आलो याचा मला आनंद आहे.

ते पुढे म्हणाले, देशातले पहिले वैज्ञानिक आमचे शेतकरी होते असे मला वाटते. कारण शेतकऱ्यांनी मातीत प्रयोग केले आणि सोने पिकवले. आपल्याला अन्नधान्याच्या समृद्धीकडे नेले. अन्न, वस्त्र मिळतील ही व्यवस्था शेतकऱ्यांनी उभी केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

आमदार रवींद्र धंगेकर यांनी अभिनेत्याला दिली श्रीरामाची प्रतिमा