Devendra Fadnavis | ‘दारू दुकानात मंदिरापेक्षा जास्त गर्दी, मग मंदिरे बंद का? (व्हिडीओ)

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज (मंगळवारी) पंढरपूरला (Pandharpur) दौऱ्यावर होते. आज माजी दिवंगत आमदार सुधाकर परिचारक (Sudhakar Paricharak) यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात फडणवीस आले होते. त्यांनतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘जेवढी गर्दी बारमध्ये होते, त्यापेक्षा कमी गर्दी मंदिरात होते. सोशल डिस्टन्स ठेवून मंदिरे उघडण्यास काय हरकत आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आम्हा हिंदूंचे तेहतीस कोटी देव आहेत, आम्हाला कुठेही देव भेटतो. परंतु, अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. हारवाला ते पुजारी असंख्य गरीब नागरिकांची उपजीविका मंदिरावर अवलंबून आहे. त्यांच्यासाठी मंदिरं उघडा, मंदिरे बंद ठेवणे ही सरकारची चूक आहे. तुम्ही दारूची दुकाने उघडी ठेवता. परंतु, मंदिरे बंद ठेवता, असं फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) जोरदार निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘शाळांच्या बाबतीत ठाकरे सरकार (Thackeray government) गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचा फटका विद्यार्थी आणि पालकांना बसत आहे.
शाळेबाबत धरसोड धोरण न ठेवता एक निश्चित धोरण राबविल्यास पालक आणि विद्यार्थी संभ्रमात राहणार नाहीत,
असा टोला देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्य सरकारवर लगावला आहे.
या दरम्यान, खासदार रणजित निंबाळकर, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार विजय देशमुख, आमदार राहुल कुल, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते आणि आमदार गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.

Web Title :- Devendra Fadnavis | why temples closed devendra fadnavis on thackeray government

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 151 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Kirit Somaiya | दापोलीतील मुरूडच्या समुद्रकिनारी अनधिकृत बंगले? शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर अन् अनिल परब अडचणीत

Jica-Pune Corporation | ‘जायका’ कंपनीच्या सहकार्यातून राबविण्यात येणार्‍या मुळा- मुठा नदी प्रदुषण नियंत्रण प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला मान्यता