देवोलीनाचा कंगनाला रोखठोक सवाल, म्हणाली-‘फुकटचे सल्ले थांबव, तू कोरोना रुग्णांसाठी काय करतेस ते अधी सांग?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात प्रत्येकजण मदतीसाठी हात पुढे करत असातना यावरुन टीका टिप्पणी होत असल्याचे पहायला मिळत आहे. बिग बॉस फेम अभिनेत्री देवोलीनी भट्टाचार्जी ही आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. देशात घडणाऱ्या चालू घडामोडीवर ती रोखठोक प्रतिक्रिया देत असते. त्यामुळेच तिला लहान पडत्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. दरम्यान, देवोलीनानं बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतवर निशाणा साधला आहे. दुसऱ्यांवर टीका करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वत: मदत कर असा उपरोधक टोला तिने कंगनाला लगावला आहे. देवोलीना एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होती.

देवोलीनाने मुलाखतीमध्ये भारतातील सद्य परिस्थितीवर भाष्य केले. यावेळ तिने अभिनेत्री कंगना राणौतवर निशाणा साधत तिला खडेबोल सुनावले आहेत. मागच्यावेळी कंगनाने महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती. तसेच बॉलिवूड सेलिब्रिटींनी केलेल्या मदतीवर देखील तिने प्रश्न चिन्ह उपस्थित करत आहे. यावरुन देवोलीनाने तिला टोला लगावला आहे.

देवोलीना म्हणाली, कंगनानं वायफळ बडबड थांबवावी अन् स्वत: घराबाहेर पडून लोकांना मदत करावी. ऑक्सिजन कुठे मिळतोय, लस मिळवण्यासाठी कुठे आणि कसं रजिस्ट्रेशन करावं, कोणत्या रुग्णालयात उपचारासाठी बेड उपलब्ध आहेत. यासारखी कित्येक कामं ती पैसे खर्च न करता करु शकते. इतर सेलिब्रिटी आपापल्या परीने मदत करत आहे. ही नुसती लोकांना फुकटचे सल्ले देतेय अन् टीका करतेय, असे देवोलीना म्हणाली.

विशेष म्हणजे राखी सांवतने देखील असाच सल्ला काही दिवसांपूर्वी तिला दिला होता. ‘सरकारला फुकटचे सल्ले ते फिरण्यापेक्षा कोरोना रुग्णांना ऑक्सिजन दे’, असा टोला राखी सावंतने लगावला होता.