DGP Rajnish Seth | ‘कोयता गँगचा बिमोड करण्यासाठी पुणे पोलिसांचे विशेष पथक’; पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (बासित शेख) – DGP Rajnish Seth | मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात कोयता गँगने (Koyta Gang, Pune) उच्छाद मांडला आहे. कोयता गँगला आवर घालण्यासाठी ‘स्पेशल स्कॉड’ची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून कोयता गँगचा बंदोबस्त केला जाणार आहे. राज्यात गाजलेल्या पुण्यातील कोयता गँग संदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ (DGP Rajnish Seth) यांनी माहिती देताना सांगितले की, पुणे पोलिसांकडून (Pune Police) या स्कॉडची स्थापना करण्यात आली असून याद्वारे पुणे शहरात आणि परिसरात दहशत माजविणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. (Maharashtra Police)

 

पुण्यातील वानवडी येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन येथे होत असलेल्या 33 व्या महाराष्ट्र पोलीस क्रिडा स्पर्धा 2023 (33rd Maharashtra Police Sports Tournament 2023) चे उद्घाटन पोलीस महासंचालक रजनीश शेठ (DGP Rajnish Seth) यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik) यांच्यासह पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

 

लवकरच कोयता गँगला पायबंद घातला जाईल
पुण्यातील कोयता गँगबाबत पत्रकारांनी विचारले असता रजनीश शेठ म्हणाले, कोयता गँगची दखल पुणे पोलीस आयुक्तांनी घेतली आहे. कोयता गँगवर कारवाई करण्यासाठी स्पेशल स्कॉडची नेमणूक करण्यात आली आहे. या गुन्ह्यांना पायबंद कशा प्रकारे घालता येईल, याबाबत उपाययोजना सुरु करण्यात आली आहे. लवकरच पुण्यातील कोयता गँगला पायबंद घातला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे. 2022 हे साल पोलीस दलासाठी चांगले गेले आहे. राज्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा (Law and Order) प्रश्न निर्माण झाला नाही. तर, नक्षलविरोधी कारवाईत देखील चांगली बाब आहे. गडचिरोली तसेच गोंदिया भागातील कामगिरी उत्तम आहे.

 

रामटेकडीतील एसआरपीएफ ग्राऊंडवर पोलीस क्रिडा स्पर्धा ७ जानेवारी रोजी सुरू झाली आहे. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते बुधवारी (दि. ११ जानेवारी) आयोजन केले होते. मात्र, काही कारणास्तव मुख्यमंत्री उद्घाटन समारंभास येऊ शकले नाही. त्यामुळे पोलीस दल व खेळांडूचा हिरमोड देखील झाल्याचे पाहायला मिळाले. तीन वर्षांनंतर स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेचे वेगळेपण देखील यंदा आहे.

 

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना रजनीश शेठ म्हणाले, राज्यात तीन वर्षानंतर ही स्पर्धा होत आहे.
कोरोनामुळे मागील तीन वर्षात ही स्पर्धा होऊ शकली नाही.
यामध्ये राज्यातील संपूर्ण पोलीस गटातील खेळाडू सहभागी होत असतात.
या स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडूंची नॅशनल स्पर्धेसाठी निवड केली जाते.
शेवटच्या वेळी राष्ट्रीय पातळीवर झालेल्या पोलीस स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाला (Maharashtra Police) तिसरा क्रमांक मिळाला होता.
यामध्ये तीस मेडल महाराष्ट्र पोलिसांनी पटकावले होते.
यातून पोलीस फिट राहतील तसेच खेळाडू देखील तयार होतील असा प्रमुख उद्देश या स्पर्धेचा असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- DGP Rajnish Seth ‘Special team of Pune Police against Koyta Gang’- Director General of Police Rajnish Sheth

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Navneet Rana | खासदार नवनीत राणांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमने; म्हणाल्या…

Cabinet Incentive Scheme | भीम अ‍ॅप आणि रूपे डेबिट कार्डसाठी मोदी सरकारची भरीव तरतूद

Hasan Mushrif | चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ ऑफरबाबत बोलले हसन मुश्रीफ; म्हणाले…