धम्म पहाटला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने बौद्ध पोर्णिमेनिम्मत “धम्म पहाट “हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वर्षी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे गायक पावा आणि जर्मन गायिका ऍडल यांच्या सुरेल आवाजातील भगवान गौतम बुद्ध यांच्या तत्वज्ञानावर आधारित संगीतमय कार्यक्रमाने पुणेकराची सकाळ अत्यंत मंगलमय झाली. पुण्यातील लोकांनी या नव्या वेगळ्या सांगीतिक कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला.

माणवी जीवाला सुखाकडे जाण्याचा मार्ग हा स्वतःकडेच असतो आपण सुखाकडे कश्या दृष्टीतून बघतो यावर सुखप्राप्ती अवलंबून असते हे बुद्धाचे तत्वज्ञान सांगणारे गीत जैसा तू सोचेगा वैसाही पायेगा” प्रचंड प्रतिसाद मिळवून गेले

“सुख का घर तेरे अंदर उसकी तलास बाहर ना कर” यासारख्या संगीतमय गीतांनी उपस्थित्यांची मने जिंकली. धम्म पहाट या संगीतमय आगळ्या वेगळ्या धाटणीच्या हा कार्यक्रम जर्मनी,आस्ट्रॉलीयसह परदेशात ही हा कार्यक्रम लोकप्रिय झाला आहे. यावेळी या कलाकार आणि गायकांचा सत्कार उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे ,संयोजक परशुराम वाडेकर ,नगरसेविका सुनीता वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पुणेकर नागरिकांसह मान्यवर मंडळी या संगीतमय धम्म पहाट चा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन दीपक मस्के यांनी केले तर स्वागत आणि आभार सुनिता वाडेकर यांनी मानले.