धनंजय मुंडे जनता दरबाराला दांडी मारणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. बलात्कारामुळे अडचणीत सापडलेल्या मुंडे यांच्यावर मोठ राजकीय संकट ओढवल आहे. दरम्यान त्यांच्यासोबत सरकारी अधिका-यांच्या बैठकांचे सत्रही सुरु आहे. त्यामुळे शासकीय कामकाज मुंडे बंगल्यावरून हाकत आहेत. त्यातच आज दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात मुंडे यांचा जनता दरबार आहे. मात्र या दरबाराला हजेरी लावणार का यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यासोबत मुंडे यांनी ट्विट करून नागरिकांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून स्ष्टीकरण दिले आहे. मात्र अद्याप मुंडे यांनी माध्यमासमोर येऊन प्रतिक्रिया दिली नाही. मीडिया ससेमिरा चुकवण्यासाठी भल्या पहाटे खासगी कारने चित्रकुट बंगल्यावर दाखल झाले, त्यावेळी त्यांच्यासोबत कोणताही सुरक्षा ताफा नव्हता. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात दुपारी 2 ते 4 दरम्यान धनंजय मुंडे यांचा जनता दरबार आहे, त्यामुळे या दरबाराला ते हजेरी लावणार का यावर प्रश्चचिन्ह आहे. त्याचसोबत मुंडे यांनी मकर संक्रांतीनिमित्त ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, कटुतेवर मात करत जीवनात गोडवा आणणारा आनंददायी सण म्हणजे मकर संक्रांत, मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, तीळ गुळ घ्या आणि गोड बोला असे त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सकाळपासून मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी समर्थकांची गर्दी आहे.