Dhananjay Munde On Pankaja Munde Defeat | बहिणीच्या पराभवावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया, म्हणाले – “या सगळ्या पराभवाची जबाबदारी…”

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – Dhananjay Munde On Pankaja Munde Defeat | लोकसभा निवडणुकीत (Beed Lok Sabha) राज्यात महायुतीला (Mahayuti) म्हणावे असे यश प्राप्त झाले नाही. या निवडणुकीत बीड मतदारसंघाचीही मोठी चर्चा सुरु होती. कारण याठिकाणी यंदा बहीण भावाची युतीही पाहायला मिळाली. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे मागील अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक आहेत. पंकजा मुंडे भाजप (BJP) पक्षाच्या तर धनंजय मुंडे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत.

मात्र यंदा महायुती असल्याने धनजंय मुंडेंना भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणे भाग होते. बीड लोकसभेचे तिकीट प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना मिळेल अशी चर्चा असतानाच इच्छुक असलेल्या पंकजा मुंडे यांची उमेदवारी निश्चित झाली. महायुती असल्याने धनंजय मुंडे यांना आपली बहीण पंकजा मुंडे यांचा प्रचार करण्याची जबाबदारी मिळाली.

दरम्यान या निवडणुकीत भाजपच्या पंकजा मुंडे याच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar NCP) बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) होते. अटीतटीच्या या लढाईत पंकजा मुंडे यांचा निसरडा पराभव झाला. सोनवणे यांनी मुंडे यांचा ६ हजार ५५३ मतांनी पराभव केला. राज्यातील हा निकाल चर्चेत असताना यावर धनंजय मुंडे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रतिक्रिया दिली आहे.(Dhananjay Munde On Pankaja Munde Defeat)

ते म्हणाले, पंकजा मुंडे यांच्या प्रचाराची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे या पराभवाची पूर्ण जबाबदारी मी घेतली आहे.
या पराभवाचं मला दुःख आणि खंत आहे.” अशा भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या.

तसेच सोनवणे यांनी विजयी झाल्यावर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे ही आभार मानले होते. यावर बोलताना मुंडे म्हणाले,
सोनवणे यांचे हे वक्तव्य संभ्रम निर्माण करणारे आहे. यातून वितुष्ट निर्माण करून पुन्हा एकदा पेटलेल्या वातावरणात
आपली भाकर भाजून घ्यायची यासंदर्भातील त्याचे विधान असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Crime News | पुणे: सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरु होता वेश्या व्यवसाय, गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Chandan Nagar Pune Crime News | पुणे: तुमच्यावर मनी लाँड्रींगची केस! चौकशीची भीती घालून सायबर गुन्हेगारांकडून महिलेला 13 लाखांचा गंडा

Sinhagad Express | मोटरमनने वेगमर्यादा न पाळल्याने सिंहगड एक्सप्रेस पकडताना प्रवाशाचा मृत्यू

Harshvardhan Patil On Sugar Export | साखर उत्पादनाचा अंदाज चुकल्यानेच केंद्राची निर्यातीवर बंदी; हर्षवर्धन पाटलांची कबुली