आता धनंजय मुंडेंसोबतची प्रेमकथा एका पुस्तकातून…

पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका तरुणीने अत्याचार केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यानंतर स्वतः मुंडे यांनी दुसऱ्या लग्नाबाबत जगजाहीर केले होते. आता आणखी एका घटनेमुळे धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण मुंडेंच्या दुसऱ्या पत्नी करुणा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या प्रेमकथेचे रहस्य एका पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या नात्यासंबंधाच्या चर्चेला उधाण आले आहे.फेसबुकवर करुणा धनंजय मुंडे या नावाने अकाऊंट असलेल्या पेज वरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यासोबत एक फोटोही जोडण्यात आला आहे. माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे लवकरच प्रकाशन होईल असे म्हटलं आहे.

May be an image of ‎3 people and ‎text that says "‎۔ON HOLY @ एक प्रेम कथा ल।व।क।र।च... सौ.करुणा धनंजय मुंडे आश्र्य जनक प्रेम कथा‎"‎‎

काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचाराचा आरोप केला होता. त्यावरून मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे संबंधित महिलेच्या बहिणीसोबत आपले परस्पर संबंध होते. या महिलेपासून दोन मुलेही असल्याचा खुलासा त्यांनी केला होता. दरम्यान, करुणा धनंजय मुंडे असे नाव समोर आले. त्यानंतर करुणा यांच्या बहिणीने धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध केलेली तक्रार मागे घेतली. त्यानंतर हे प्रकरण इथे थांबले असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आता करुणा यांनी आपण पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता या पुस्तकात नक्की कोणती माहिती असणार यावरच सध्या चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर करुणा मुंडे यांच्या पोस्टचे स्क्रीनशाॉट धुमाकूळ घालत आहे. मात्र अद्याप धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

रेणू शर्मा यांनी मुंडेंवर काय आरोप केले होते?
धनंजय मुंडेंनी २००६ पासून चार-एक वर्ष सोडल्यास माझा वापर केला. २०१३ पासून त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. लग्नाचं वचन देऊन माझा वापर करून घेतला, असा आरोप तक्रारदार महिलेनं केले होते. दरम्यान त्यांना इतकी वर्ष आपण का गप्प होता असा प्रश्न विचारला असता संबंधित महिलेने मुंडेंकडे माझे आक्षेपाहार्य फोटो, व्हिडीओ होते. व्हिडीओ कॉलवरही ते शरीर संबंधांची मागणी करायचे आणि त्यानंतर शरीरसंबंध ठेवायचे. त्यामुळे मी गप्प होते. असे स्पष्टीकरण दिले होते.

मला आयुष्यत काहीतरी करून दाखवण्याची इच्छा होती. त्याचाच मुंडेंनी गैरवापर केला. त्यांनी माझा फक्त वापर करून घेतला असा गंभीर आरोप केला होता. मात्र काही दिवसांतच रेणू शर्माने धनंजय मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली होती.

माझ्यावरचे आरोप खोटे, मला ब्लॅकमेल करणारे; धनंजय मुंडेंनी केला होता खुलासा
आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये या आरोपाचे खंडन करत सविस्तर खुलासा केला होता. माझ्यावरील आरोप हे खोटे बदनामी आणि ब्लॅकमेल करणारे आहेत. या पोस्टमध्ये मुंडे यांनी समाज माध्यमांमधून माझ्याविषयी काही कागदपत्र प्रसारित होत असल्याचे तसेच मीडिया व सोशल मिडियाद्वारे माझ्यावर बलात्काराचे आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने (या रेणु शर्मा या करुणा शर्मा यांच्या सख्या लहान बहीण आहेत) स्वतः त्यांच्या खात्यावरून ट्विट केले आहे. माझ्याविरुद्ध काही तक्रार दाखल केल्याचा उल्लेख त्या कागदपत्रांमध्ये दिसून येतो. हे सर्व आरोप खोटे माझी बदनामी करणारे आणि मला ब्लॅंकमेल करणारे असल्याचे सांगितले होते