‘कोरोना’ पीडित आईला खांदा देणाऱ्या 5 मुलांचाही Covid-19 मुळे मृत्यू, सहाव्याची प्रकृती ‘गंभीर’

धनबाद : वृत्तसंस्था – झारखंडमधील धनबादमधून एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे एका कुटूंबामध्ये कोविड-१९ मुळे आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७ व्या सदस्याची प्रकृती गंभीर आहे. असे सांगितले जात आहे की, कोरोना पीडित आईला खांदा देणाऱ्या तिच्या पाच मुलांनाही संसर्ग झाला. आईच्या निधनानंतर एकापाठोपाठ ५ मुलांचा मृत्यू झाला आहे. सहाव्या मुलाची प्रकृती गंभीर आहे. धनबादमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी धनबादमध्ये फक्त एका रुग्णाचा मृत्यू झाला, उर्वरित मृत्यू झारखंड आणि बंगालच्या वेगवेगळ्या शहरांमधील रुग्णालयात उपचार घेत असताना झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूची लागण झालेल्या या कुटुंबातील सहा जणांचा गेल्या १५ दिवसात मृत्यू झाला आहे. सांगितले जात आहे कि भारतातील अशा प्रकारची ही पहिली घटना आहे, ज्यात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एकाच कुटुंबातील ६ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि कुटुंबातील इतर सदस्यही आजारी आहेत.

४ जुलै रोजी झाले होते आईचे निधन
ही घटना धनबादच्या कतरास क्षेत्रातील आहे. येथे राणी बाजारातील रहिवासी असलेल्या कुटुंबातील सहाव्या सदस्याचा रांचीमधील रिम्समध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला. सांगितले जात आहे की, ४ जुलै रोजी पहिले ८८ वर्षाच्या आईचा बोकारो येथील नर्सिंग होममध्ये मृत्यू झाला. तपासणीत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांच्या एका मुलाचा बीसीसीएलच्या सेंट्रल हॉस्पिटल कोविड-सेंटरमध्ये मृत्यू झाला, तर दुसर्‍या मुलाचा मृत्यू पीएमसीएचमध्ये झाला. यानंतर रांचीच्या रिम्समध्ये तिसर्‍या मुलाचा आणि चौथ्याचा जमशेदपूरच्या टीएमएच रुग्णालयात मृत्यू झाला. पाचव्या मुलाचाही सोमवारी रिम्समध्ये मृत्यू झाला.

गेल्या महिन्यात जूनमध्ये ही महिला दिल्लीहून लग्न समारंभात कतरास येथील आपल्या घरी आली होती. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. वृद्ध महिलेचा सहावा मुलगा येऊ शकला नव्हता.