Dhangar Reservation | धनगर समाज आक्रमक, नेत्यांना गावबंदी करणार, सरकारनं आरक्षणाचा शब्द न पाळल्याने उद्यापासून आंदोलन

अहमदनगर : Dhangar Reservation | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला सळो की पळो करून सोडले असताना आता धनगर समाज देखील आरक्षणासाठी (Dhangar Reservation) उद्या १६ तारखेपासून आंदोलन करत आहे. सरकारने आरक्षणाचा शब्द पाळला नाही, असा समाजाचा आरोप आहे. दरम्यान, ठिकठिकाणी साखळी उपोषण आणि नेत्यांना गावबंदी करण्याचा इशारा यशवंत सेनेने दिला आहे.

काही दिवसांपूर्वी चौंडी येथे यशवंत सेनेने एकवीस दिवस उपोषण केले होते. त्यावेळी सरकारने धनगर समाजाला लेखी आश्वासन दिले. मात्र, शब्द पाळला नाही. यामुळे धनगर समाजाने पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

यशवंत सेनेचे (Yashwant Sena) राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी सांगितले की, ५० दिवसांत धनगर समाजाच्या आरक्षणाचा (Dhangar Reservation) निर्णय घेऊ असे आश्वासन सरकारने दिले होते. सरकारच्या या शब्दावर आम्ही विश्वास ठेवून उपोषण मागे घेतले होते.

बाळासाहेब दोडतले म्हणाले, धनगर समाजाचा गेल्या ७५ वर्षांचा वनवास दूर होईल. दिवाळी गोड होईल अशी आम्हाला आशा होती. परंतु राज्य सरकराने (State Govt) धनगर बांधवांची क्रूर थट्टा केली आहे. आज ५० दिवस संपले तरी सरकारने आरक्षणासाठी एक पाऊल देखील उचललेले नाही. म्हणूनच आम्ही उद्यापासून उपोषण करत आहोत.

दोडतले पुढे म्हणाले, चौंडीत आमरण उपोषणाला सुरुवात होणार असली तरी त्याचे पडसाद राज्यातील प्रत्येक गावात,
तालुक्यात, जिल्ह्यात उमटतील. १५-२० ठिकाणी साखळी उपोषण सुरू होईल.
धनगर बांधव पुढाऱ्यांना घरातून बाहेर पडण्यास बंदी करेल.

बाळासाहेब दोडतले म्हणाले, धनगर ओबीसीतील सर्वात मोठा घटक आहे. परंतु कुठल्याच ओबीसी नेत्याने धनगर समाजाच्या
आरक्षणाला पाठिंबा दिला नाही. स्पष्ट भूमिका मांडली नाही. १७ तारखेला ओबीसींचा मेळावा होत आहे.
त्यामध्ये धनगर आरक्षणाला ओबीसी नेत्यांनीज पाठिंबा द्यावा अन्यथा या पुढे आम्हाला गृहित धरू नका.

राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करताना यशवंत सेनेने म्हटले की, राज्यात धनगर समाज हा सर्वात मोठा दुसऱ्या
क्रमांकाचा समाज आहे. त्याचा हा अपमान आहे. सरकार आंदोलन सुरू असताना बैठका घेते, वेगळी भूमिका घेते आणि
प्रत्यक्षात वेगळा निर्णय घेते. त्यामुळे राज्य सरकारबद्दल धनगर समाजाच्या भावना तीव्र आहेत.
त्याचे पडसाद येणाऱ्या काळात राज्यात दिसतील.

राज्य सरकारला इशारा देताना यशवंत सेनेने म्हटले की, राज्य सरकारला धनगरांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल.
धनगर समाजाचे युवक गावात पुढाऱ्यांना फिरू देणार नाहीत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

अखेर गोविंदबागेत शरद पवारांच्या पाठिशी दिसले अजित पवार! सुप्रिया सुळेंनी पोस्ट केले फोटो