ती सुंदर मुलगी वाघाला कुत्र समजून मारते ; धनंजय मुंडेंचा शिवसेनेवर अप्रत्यक्ष हल्लाबोल

रायगड : पोलिसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेला सुरुवात झाली आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही उत्सुकता वाढली आहे. राष्ट्रवादीने भाजप आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. यात्रेच्या  पहिल्याच दिवशी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे बोचरी टीका केली आहे.

मुंडेंनी जंगलातील एक उदाहरण देत शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. जंगालात एक वाघ असतो. तो आनंदात मजा करत असतो. एक दिवस त्या वाघाला मुलगी आवडते. तो वाघ त्या मुलीच्या प्रेमात पडतो. एक दिवस त्यामुलीच्या लक्षात येते की त्या वाघाला नखं आहेत. त्यामुळे ती मुलगी त्या वाघाला म्हणते, तु मला आवडतो, पण तुझ्या पंजाला नख आहेत. ती मला लागतील. त्यावर वाघ विचार करतो हो हे खर आहे. तिला माझी नखं लागली तर म्हणून तो नखं काढून येतो. मुलगी त्याला पुन्हा म्हणते मला तु खरच आवडतो. पण मला तुझे सुळे दात आहेत ते लागले तर त्यावर तो वाघ पुन्हा जाऊन दात काढून येतो, असं त्यांनी सांगितलं.

त्यावर दात काढून आल्यावर वाघाला समजत आपण जंगलातले वाघ आहोत. आपले तर दातही गेले नखंही गेली. त्यानंतर त्याच वाघाची त्याच्याच जंगलात कुत्र्यासारखे वाईट हाल होतात. त्यावर पुन्हा ती मुलगी त्याच्यासमोर येते. त्याला काही समजायच्या आत ती मुलगी हातात काठी घेऊन त्या वाघाला कुत्र म्हणून बडवते, असं त्यांनी सांगितलं.

अशी गोष्ट सांगून, त्यावर ,कृपया ती मुलगी कोण आणि कुत्र कोण हे मला विचारू नका, ही विनंती करतो, असंही त्यांनी म्हटलं. त्यावर सभेत एकच हशा पिकला होता.

दरम्यान, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेत आज सकाळी परिवर्तन यात्रेला सुरूवात झाली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाडमधील चवदार तळे इथं जाहीर सभादेखील होणार आहे.