Dhanori Pune Crime | पुण्यात घरफोडीचे सत्र सुरूच, धानोरीत दोन तासात लाखोंचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dhanori Pune Crime | पुण्यात घरफोडीचे (House Burglary In Pune) सत्र सुरुच आहे. शाळांना सुट्ट्या लागल्याने अनेकजण बाहेरगावी जात आहेत. याचा गैरफायदा चोरटे घेत आहेत. सिंहगड रोड परिसरातील (Sinhagad Road) एक डॉक्टरच्या बंगल्यात चोरट्यांनी घरफोडी करुन 44 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तर धानोरी येथे एका महिलेच्या घरातून 2 लाख 96 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत संदीप कृष्णा खिलारे (वय-37 रा. मार्कंडेयनगर, वैदूवाडी, हडपसर) यांनी सोमवारी (दि.29) विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन अज्ञात चोरट्या विरुद्ध आयपीसी 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.28) सायंकाळी पाच ते सात या वेळेत गोकूळनगर, धानोरी येथील गुडविल शिवम बिल्डींग मधील फ्लॅट नं. 9 मध्ये घडली आहे.(Dhanori Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सासूचे धानोरी येथील गुडविल शिवम बिल्डींग मध्ये फ्लॅट आहे.
त्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
घरातील बेडरुमध्ये असलेल्या कपाटाचा दरवाजा व लॉकर उचकटून 2 लाख 96 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख
रक्कम असा एकूण 2 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गेड करीत आहेत.

तरुणाला दगडाने मारून लुटले

लोहगाव : लोहगाव परिसरातील (Lohegaon) फॉरेस्ट पार्क (Forest Park Pune) रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या तरुणाला
चार अल्पवयीन मुलांनी दगडाने मारहाण करुन 20 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही घटना सोमवारी (दि.29) दुपारी दीडच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी राहुल अंबादास होंडे (वय-21 फोर्च्युन प्लाझा, खराडी, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police) फिर्य़ाद दिली आहे.

फिर्यादी राहुल होंडे हे फॉरेस्ट पार्कच्या रस्त्याच्या बाजूला थांबले होते. त्यावेळी आरोपींनी तुम्ही फॉरेस्ट पार्क रस्त्यावर लोकांना एकटे गाठून चोऱ्या-माऱ्या करता का अशी विचारणा केली. तसेच मोठमोठ्या आवाजात शिवीगाळ करुन हाताने व दगडाने मारहाण करुन मोबाईल, रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 20 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरुन नेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sangli Lok Sabha | सांगलीच्या राजकारणात मोठी घडामोड, ‘वंचित’ने पाठिंबा दिल्याने विशाल पाटील यांची बाजू मजबूत!

Sharad Pawar On PM Narendra Modi | ओतूरच्या सभेत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर ! होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी आत्मा अस्वस्थ होतो – शरद पवार