Sangli Lok Sabha | सांगलीच्या राजकारणात मोठी घडामोड, ‘वंचित’ने पाठिंबा दिल्याने विशाल पाटील यांची बाजू मजबूत!

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – Sangli Lok Sabha | महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) काँग्रेस पक्ष (Congress) सांगलीच्या जागेसाठी आग्रही असताना ठाकरेंच्या शिवसेनेने आघाडीचे (Shivsena UBT) नियम तोडत चंद्रहार पाटलांना (Chandrahar Patil) अचानक उमेदवारी जाहीर केल्याने मोठा गुंता निर्माण झाला होता. मात्र, ठाकरे गटाने शेवटपर्यंत माघार घेतली नाही. यामुळे काँग्रेसमधून इच्छुक असलेले विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. आता वंचित बहुजन आघाडीने (Vachit Bahujan Aghadi-VBA) विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याने त्यांची बाजू मजबूत झाली आहे. यामुळे येथील निवडणुकीत चुरस वाढली आहे.(Sangli Lok Sabha)

सांगलीत महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, महायुतीचे भाजपाचे (Mahayuti BJP Candidate) उमेदवार संजयकाका पाटील (Sanjaykaka Patil) आणि अपक्ष विशाल पाटील अशी तिरंगी लढत आहे. उमेदवारी न मिळाल्याने येथील स्थानिक काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज आहेत. याचा फटका चंद्रहार पाटलांना महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बसू शकतो. त्यातच आज वंचितने देखील विशाल पाटलांना उमेदवारी दिल्याने एकुणच स्थिती बदलली आहेत.

येथील निवडणूक आता चुरशीची झाल्याने जनता कुणाच्या बाजूने कौल देते, हे निकालातूनच समजणार आहे.
आधी वंचितने सांगलीत वंचित बहुजन आघाडीने ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांना पाठिंबा दिला होता.
मात्र, काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची
भेट घेतली होती. या भेटीत आंबेडकर यांनी पाठिंबा देण्याचा शब्द दिला होता.
त्याप्रमाणे आज शेंडगे यांचा पाठिंबा काढून घेत विशाल पाटील यांना दिल्याचे जाहीर केले.

प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, प्रतिक पाटील माझ्याकडे आले होते. काय करायचे विचारत होते. मी त्यांना म्हणालो की, हिंमत असेल, तर लढा. तुम्ही लढलात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. ते लढले, तर पाठिंबाही देऊ आणि निवडून आणू. त्यानुसार आता वंचितने पाठिंबा दिल्याचे जाहीर केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar On PM Narendra Modi | ओतूरच्या सभेत शरद पवारांचे नरेंद्र मोदींना सडेतोड उत्तर ! होय मी भटकती आत्मा, माझा आत्मा स्वतःसाठी नाही, जनतेसाठी आत्मा अस्वस्थ होतो – शरद पवार