Dia Mirza | …म्हणून अभिनेत्री दिया मिर्झा लावते ‘हे’ आडनाव

पोलीसनामा ऑनलाइन : Dia Mirza | बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींच्या यादीत दिया मिर्झाचे नाव घेतले जाते. आज दिया मिर्झा तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. 9 डिसेंबर 1981 रोजी हैदराबादमध्ये दियाचा जन्म झाला होता. बॉलिवूडमध्ये तिने स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी खूपच संघर्ष केला होता. दियाने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांना आपलेसे केले आहे. (Dia Mirza)

बॉलिवूडमध्ये ज्या पद्धतीने दियाने संघर्ष केला, अगदी त्याच पद्धतीने तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यातही संघर्ष केला
होता. दिया केवळ चार वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. यानंतर तिच्या आईने हैदराबाद येथील अहमद मिर्झा सोबत लग्न केले. यानंतर तिच्या दुसऱ्या वडिलांनी तिला मनापासून स्वीकारले होते आणि तिचा सांभाळदेखील सुरळीत केला होता. (Dia Mirza)

हळूहळू दोघांमधील नाते घट्ट बनत गेले आणि शेवटी सावत्र वडील अहमद यांच्यासोबत असलेल्या खास
नात्यामुळे दियाने मिर्झा हे आडनाव लावायला सुरुवात केली. अभिनेत्री दिया मिर्झाने वयाच्या सोळाव्या
वर्षी मल्टिमीडिया कंपनीत कामाला सुरुवात केली. त्यानंतर तिने अठराव्या वर्षी मीस एशिया पॅसिफिकचा
किताब मिळवला, तर ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
यानंतर तिने प्रेक्षकांना अनेक हिट चित्रपट दिले.

Web Title :- Dia Mirza | dia miraza birthday special know why does her take a muslim surname even though father is german and mother is bengali

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Article 144 | महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रकरणी कोल्हापुरात 144 कलम लागू

Vasant More | वसंत मोरेंची नाराजी दूर करायला अमित ठाकरेंची मध्यस्थी; नाराजी दूर होणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष