.. म्हणून अक्षयच्या ‘त्या’ ट्विटवर संतापली  दिया मिर्झा 

मुंबई : वृत्तसंस्था – दोन दिवसापूर्वी बॉलिवूडमधील करण जोहर, अक्षय कुमार, अजय देवगण, प्रसून जोशी, सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या सह अनेक दिग्गज कलाकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान चित्रपट निर्मिती मधील अनेक समस्या,आव्हाने व  चित्रपटाच्या भविष्याविषयी  त्यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. ही भेट खूप सकारात्मक झाली अशी माहिती अक्षय कुमारने देत या भेटी विषयी फोटो शेअर केली होते.

या भेटी नंतर अभिनेता अक्षय कुमारने केलेल्या ट्विटनंतर दिया मिर्झाने यावर नाराजी व्यक्त केली आहे. या बैठकीला अक्षय कुमार, अजय देवगन यांच्यासह बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांचा समावेश होता परंतु, यात एकाही महिलेचा समावेश नसल्याने दिया मिर्झानं संताप व्यक्त केलाय.

मोदींशी झालेल्या भेटी नंतर अक्षयने एक ट्विट केले होते. हे ट्विट रिट्विट करीत दिया मिर्झाने आपली नाराजी व्यक्त केलीय. @akshaykumar ला टॅग करीत दियानं म्हटंलय, हे चांगलं आहे! या बैठकीसाठी एकाही महिलेला सोबत घेतले नाही, यामागे काही खास कारण होते का?, असा सवाल तिनं अक्षयला विचारला आहे. दिया मिर्झासोबतच ‘लिपस्टिक अंडर माय बुर्का’ची दिग्दर्शक अलंकृता श्रीवास्तव यांनीही या प्रतिनिधीमंडळावर महिलेला सोबत न घेतल्यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत.
You might also like