Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण, लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Diabetes – Mental Disease | डायबिटीजमध्ये रक्तातील ग्लुकोजची (शुगर) पातळी वाढते. डायबिटीजचे दोन मुख्य प्रकार आहेत – टाईप १ आणि टाईप २ डायबिटीज. डायबिटीजचा आजार तुम्हाला किडनी, न्यूरो, नेत्र आणि हृदय रुग्ण बनवतो. (Diabetes – Mental Disease)

पण तुम्हाला माहीत आहे का, डायबिटीजमुळे डिप्रेशन होऊ शकते. अशा रुग्णांमध्ये सामान्यपेक्षा जास्त एंग्जायटी आणि डिसऑर्डर आढळून आले आहेत. कोरोना कालावधीनंतर केलेल्या स्टडीमध्ये हे समोर आले आहे. (Diabetes – Mental Disease)

कानपूरच्या जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजच्या मेडिसिन आणि मानसोपचार विभागाने संयुक्तपणे हे संशोधन केले आहे. दीड वर्ष चाललेल्या या संशोधनात दोन वर्षांहून अधिक काळ झालेल्या डायबिटीज रुग्णांना घेण्यात आले, ज्यांचे वय २० ते ६० वर्षे होते. संशोधनात, डायबिटीजचा प्रत्येक दुसरा रुग्ण उदासीनतेमध्ये सापडलेला आढळून आला.

चिंताजनक बाब म्हणजे, शुगरच्या आजाराने त्रस्त महिला पुरुषांच्या तुलनेत अशा आजारांना जास्त बळी पडल्या आहेत. मेडिकल कॉलेजच्या एथिक्स कमिटीच्या मंजुरीनंतर संशोधन करण्यात आले, ज्यामध्ये डायबिटीज असलेले ९१ पुरुष आणि ५४ महिलांना घेण्यात आले.

डिप्रेशनमधून कसे बाहेर पडावे?

रुग्ण, मित्रांची समजून घेण्याची क्षमता

डिप्रेशन समजून घेणे आणि स्वीकारणे महत्त्वाचे आहे. हे सहसा बहुतेक लोकांच्या आयुष्यात एकदाच येते,
परंतु रुग्ण आणि प्रियजनांनी समजून घेणे आवश्यक आहे.

एक्सपर्टचे मत

डिप्रेशनवर एक्सपर्टच्या मदतीने उपचार केले पाहिजेत. प्रोफेशनल मानसिक आरोग्य तज्ञाशी चर्चा करा,
जेणेकरून स्थिती सखोलपणे समजून घेता येईल आणि योग्य उपचार ठरवता येईल.

हेल्दी लाईफस्टाईल

निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती यामुळे मानसिक आरोग्य सुधारते.

मित्र आणि कुटुंबाशी संवाद

कुटुंबिय आणि मित्रांसोबत वेळ घालवणे आणि त्यांच्याकडून सहकार्य मिळवणे महत्वाचे आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI Pilot Project | आरबीआय कडून कर्ज मिळणे होणार अधिक सुखकर; सुरु करणार नवीन पब्लिक टेक प्लॅटफॉर्म असणारा पायलट प्रोजेक्ट

MNS Chief Raj Thackeray | ‘जे आज खोके खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर आहेत, ह्यांनी कोव्हीड पण…’ राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

New Housing Scheme | शहरामध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या लोकांना घेता येणार हक्काचे घर; पंतप्रधान मोदींनी केली नवीन योजना घोषित