Diesel Price Hike | घाऊक खरेदीदारांसाठी महागले डिझेल, 25 रुपये लीटरने वाढले दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Diesel Price Hike | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या वाढीचा आतापर्यंत किरकोळ ग्राहकांवर परिणाम झाला नसून, बल्क यूजर्स (Bulk Users) ला मोठा फटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी बल्क यूजर्ससाठी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 25 रुपयांनी वाढ केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. मात्र, पेट्रोल पंपावरील किरकोळ ग्राहकांसाठी दरात कोणतीही वाढ झालेली नाही. (Diesel Price Hike)

 

इतका वाढला दर
दिल्ली बल्क यूजर्ससाठी डिझेलची किंमत 115 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचवेळी पेट्रोल पंपांवर 86.67 रुपये प्रतिलिटर दराने डिझेल विकले जात आहे. मुंबईत बल्क यूजर्सना विकल्या जाणार्‍या डिझेलची किंमत 122.05 रुपये प्रति लिटर झाली आहे, तर पेट्रोल पंपांवर विकल्या जाणार्‍या डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर आहे.

 

Bulk Customers म्हणजे काय
संरक्षण, रेल्वे आणि परिवहन महामंडळ, पॉवर प्लांट, सिमेंट प्लांट आणि केमिकल प्लांटचा प्रामुख्याने बल्क यूजर्समध्ये समावेश होतो. तेल विपणन कंपन्या मोठ्या प्रमाणात तेल वापरणार्‍या ग्राहकांच्या गरजा स्वतंत्रपणे पूर्ण करतात. या ग्राहकांसाठी तेलाची साठवणूक आणि हाताळणीसाठी कंपन्या विशेष व्यवस्था करतात. (Diesel Price Hike)

पेट्रोल, डिझेलचे दर 136 दिवसांपासून स्थिर
जगभरात तेल आणि इंधनाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.
असे असूनही, PSU तेल कंपन्यांनी 4 नोव्हेंबर 2021 पासून किरकोळ ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केलेली नाही.

 

पेट्रोल पंपांची विक्री वाढली
या महिन्यात पेट्रोल पंपावर इंधनाची विक्री वाढली आहे. याचे कारण म्हणजे बसचालक आणि मॉल्ससारखे बल्क यूजर्स तेल कंपन्यांकडून थेट तेल मागवण्याऐवजी पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदी करत आहेत.
त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांच्या तोट्यात आणखी वाढ झाली आहे.

 

पेट्रोल पंप बंद करण्याच्या पर्यायावर विचार
या प्रकरणाची थेट माहिती असलेल्या तीन सूत्रांनी सांगितले की, Nayara Energy, Jio-bp आणि Shell या खाजगी रिटेलर्सना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
अशा स्थितीत पेट्रोल, डिझेल 136 दिवस स्थिर दराने विकण्याच्या तुलनेत पंप बंद करणे कंपन्यांना अधिक व्यावहारिक पर्याय वाटत आहे.

 

रिलायन्सने 2008 मध्ये घेतला होता हा निर्णय
रिलायन्स इंडस्ट्रीजने 2008 मध्ये देशभरातील 1,432 पेट्रोल पंप बंद केले.
याचे कारण सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून सवलतीच्या दरात विकल्या जाणार्‍या तेलाच्या दराशी कंपनीचा मेळ बसत नसल्याने कंपनीची विक्री पूर्णपणे Nil झाली होती.
बल्क यूजर्स पेट्रोल पंपांवरून इंधन खरेदी करत असल्याने पुन्हा एकदा ही स्थिती उद्भवू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

 

Web Title :- Diesel Price Hike | diesel price hike big jolt to bulk users as omcs hike diesel rate by rs 25 per liter

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा