Digital Eyes Problem | दिर्घकाळ डिजिटल स्क्रीन पाहण्याने डोळ्यांचे कसे होते नुकसान, जाणून घ्या एक्सपर्टकडून

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Digital Eyes Problem | आजच्या डिजिटल युगात क्वचितच कोणी गॅजेट्स वापरत नसतील. तासन्तास नेटफ्लिक्स (Netflix) पाहणे असो, संगणक (Computer) किंवा लॅपटॉपवर (Laptop) दिवसभर काम करणे असो, व्हिडीओ गेम्स (Video Games) खेळणे असो किंवा मोबाईलवर गेम्स (Mobile Games) किंवा सोशल मीडिया (Social Media) पाहणे असो. आपण सर्वजण आपल्या दिवसाचा चांगला भाग स्क्रीनकडे (Digital Eyes Problem) बघत घालवतो.

 

जर तुम्हालाही स्क्रीन पाहण्याचे व्यसन लागले असेल, तर त्याचा फटका तुमच्या डोळ्यांना (Digital Eyes Problem) सहन करावा लागतो हे जाणून घेणेही तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

 

अलीकडील संशोधनानुसार, 70 टक्के टीनएजर्सना वाटते की त्यांना मोबाईलचे व्यसन आहे आणि 40 टक्के पालकांचा असा विश्वास आहे की ते देखील त्यांच्या स्मार्टफोनपासून (Smartphone) दूर राहू शकत नाहीत.

 

असेही बरेच लोक आहेत ज्यांना वाटत असेल की आपण फोनवर जास्त वेळ घालवत नाही, परंतु त्यांनी दिवसभरात स्मार्टफोन, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेट (Tablet), गेम आणि टीव्हीवर किती वेळ घालवला याचा विचार केला पाहिजे.

 

आपल्यापैकी बरेच जण झोपण्यापेक्षा स्क्रीन बघण्यात जास्त वेळ घालवतात. ही समस्या कोणत्याही एका देशासाठी विशिष्ट नाही, डिजिटल उपकरणांवर अवलंबून राहणे ही जगभरातील समस्या आहे हे सहज लक्षात येते. (Digital Eyes Problem)

 

कंप्युटर स्क्रीनसमोर (Computer Screen) काम करणार्‍या 50 टक्क्यांहून जास्त लोकांना डिजिटल आय स्ट्रेन नावाची स्थिती जाणवते. डिजिटल आय स्ट्रेन (Digital Eye Strain) च्या सामान्य लक्षणांमध्ये डोळ्यांचा थकवा (Eye Fatigue), डोळ्यांमध्ये कोरडेपणा (Dryness In Eyes), डोळ्यांची जळजळ किंवा खाज येणे, डोळे लाल होणे (Red Eyes) आणि डोकेदुखी (Headache) यांचा समावेश होतो.

 

ही लक्षणे उच्च-ऊर्जा दृश्यमान प्रकाश (High-energy Visible Light) किंवा डिजिटल उपकरणांद्वारे उत्सर्जित होणार्‍या निळ्या प्रकाशाच्या अतिप्रमाणात संपर्कात आल्याने उद्भवते, असे मानले जाते.

सतत स्क्रीनच्या वापराने काय होईल (Excessive Screen Time) ?
शार्प साईट आय हॉस्पिटल्सचे वरिष्ठ सल्लागार डॉ. हेम शाह (Dr. Hem Shah, Senior Consultant at Sharp Sight Eye Hospital) म्हणाले, स्क्रीनकडे जास्त वेळ पाहिल्याने डोळ्यांवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे डोळे थकतात. जर तुम्ही अनेक तास छोटे-छोटे पिकसल्स सतत पहात राहिला तर डिजिटल उपकरणांमधून बाहेर पडणार्‍या निळ्या प्रकाशाकडे पहात राहिल्याने डोळ्यांची उघड-झाप कमी करता. आणि स्क्रीनची हालचाल डोळ्यांना लक्ष केंद्रित करणे कठीण करेल.

 

आपण अनेकदा लॅपटॉप, मोबाईल किंवा कोणत्याही प्रकारची स्क्रीन योग्य अंतरावर किंवा कोनात ठेवत नाही, त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. या सर्व गोष्टींमुळे डोकेदुखी, अंधुक दिसणे (Blurred Vision), डोळे कोरडे पडणे ( Dry Eyes), मान आणि खांदे दुखणे (Neck and Shoulder Pain) इत्यादी समस्या उद्भवतात.

 

थोडक्यात, आपल्या डोळ्यांना सतत हायड्रेशन (Hydration) आणि पोषण (Nutrition) आवश्यक असते, त्यामुळेच आपले डोळे अनेकदा मिटतात.
जेव्हा तुम्ही स्क्रीनकडे बराच वेळ टक लावून पाहता तेव्हा डोळे कमी मिटतात, ज्यामुळे डोळे कोरडे होतात.

 

डिजिटल आईस कसे टाळायचे (How To Avoid ‘Digital Eye’)?
शार्प साईट आय हॉस्पिटलच्या सिनियर कन्सल्टंट डॉ. सौम्या शर्मा (Dr. Saumya Sharma, Senior Consultant at Sharp Sight Eye Hospital)
म्हणतात, डोळ्यांचा ताण ही एक सामान्य स्थिती आहे, विशेषत: संगणक, फोन आणि टॅब्लेटसह दीर्घकाळापर्यंत डिजिटल वापरामुळे
तुम्ही तुमच्या डोळ्यांची समस्या (Eye Problems) कमी करण्यासाठी काही पावले उचलल्यास तुमच्या
डोळ्यांवर जास्त डिजिटल स्क्रीन टाइमचा परिणाम सहज टाळता येऊ शकता.

 

डोळ्यांवर ताण कमी पडावा यासाठी तुम्ही 20-20-20 नियम पाळू शकता.
या नियमानुसार, दर 20 मिनिटांनी 20 सेकंदांचा ब्रेक घ्या आणि डिजिटल स्क्रीन 20 फूट दूर ठेवा.
तुम्ही आय-ड्रॉप (Eye-drop) देखील वापरू शकता.

तसेच प्रकाशाची सुद्धा काळजी घ्या जेणेकरून डोळ्यांवर कमी ताण पडेल.
याशिवाय दर अर्ध्या तासाने 5 मिनिटांचा ब्रेक घेतल्याने थकवा आणि तणाव दोन्ही टाळता येऊ शकते.

 

या सोप्या टिप्सचे पालन करूनही तुम्हाला आराम मिळत नसेल,
तर डोळ्यांशी संबंधित काही अन्य समस्यांनी ग्रासलेले असू शकते.
यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

 

#हेल्थ टिप्स #हेल्दी लाइफस्टाइल #डिजिटल डोळे #Jagran Plus #Lifestyle And Relationship #Health And Medicine #Lifestyle
#Health #Health Tips #Healthy Lifestyle #Eye Health #Digital Eyes #Eye Strain Prevention #Eye Strain #Dry Eyes Tips

 

Web Title :- Digital Eyes Problem | how long screen time affects your eye health know from experts

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | विविध गुन्हे दाखल असलेल्या नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड टोळीवर तिसऱ्यांदा ‘मोक्का’ कारवाई

 

Pune Crime | दीड हजार रुपये परत न दिल्याने दगडाने ठेचून तरुणाचा खून; डेंगळे पुलाखालील नदीपात्रातील घटना, शिवाजीनगर पोलिसांकडून एकाला अटक

 

Maharashtra Assembly Speaker Election | राज्यपाल विरुद्ध ‘मविआ’ संघर्ष वाढणार?, ठाकरे सरकारचा ‘हा’ प्रस्ताव फेटाळला