Dilip Dhole | मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांची बदली; संजय काटकर नवे आयुक्त

ईडीकडून दिलीप ढोले यांना समन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन -Dilip Dhole | मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले (Dilip Dhole) यांची अडीच वर्षांच्या कार्यकाळानंतर शासनाकडून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक (CIDCO Joint Managing Director) संजय काटकर (Sanjay Katkar) यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. सनदी अधिकारी असलेले काटकर यांनी बुधवारी (दि.9) सायंकाळी मीरा भाईंदर महापालिकेच्या (Mira Bhayander Municipal Corporation) मुख्यालयात येऊन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.

तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या जवळचे म्हणून ढोले यांची ओळख होती. ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकांशी (Builders) कथित घोटाळ्याशी संबंधी मनी लाँड्रिंगच्या (Money Laundering) तपासाचा एक भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी-ED) त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले असतानाच राज्य सरकारने (Maharashtra State Government) त्यांची आयुक्त पदावरून उचलबांगडी केली आहे.

तत्कालीन मिरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी 2021 मध्ये पदभार स्वीकारला होता.
त्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेत (Thane Municipal Corporation) अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते.
फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) काळात ते तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे ते
खासगी सचिव होते. 2020 मध्ये त्यांची मीरा भाईंदर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती.
कोरोना काळात मिरा भाईंदर पालिकेचे आयुक्त बालाजी खतगावकर (Balaji Khatgaonkar) यांची बदली करण्यात
आली होती. त्यांच्या जागी दिलीप ढोले यांनी महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. (Dilip Dhole)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nalasopara Crime News | पोलीस भरती प्रशिक्षण क्लासेसमध्ये मुलींचे लैंगिक शोषण, रेल्वे पोलीस दलातील दोघांना अटक