Nalasopara Crime News | पोलीस भरती प्रशिक्षण क्लासेसमध्ये मुलींचे लैंगिक शोषण, रेल्वे पोलीस दलातील दोघांना अटक

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन – Nalasopara Crime News | नालासोपारा येथे पोलिसांकडून मुलींचे लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वसई रेल्वे पोलीस ठाण्यात (Vasai Railway Police Station) कार्यरत असणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. आरोपी नालासोपारा (Nalasopara Crime News) येथे पोलीस भरती प्रशिक्षण क्लासेस (Police Recruitment Training Classes) चालवत होता. दोन पीडित मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात (Nalasopara Police Station) तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी पोलीस आणि त्याच्या मैत्रिणीविरोधात पोक्सो अंतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल करुन दोघांना अटक केली.

समाधान गावडे Saadhan Gawde (वय-28) आणि त्याच्या 25 वर्षीय मैत्रीण वसई रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. गावडे हा नालासोपारा (Nalasopara Crime News) येते विजयी भव नावाची पोलीस अकादमी (Police Academy) चालवतो. त्याच्यावर क्लासेमध्ये येणाऱ्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दोन पीडित मुलींनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आरोपी गावडे हा मुलींना अश्लील मेसेज पाठवत होता तसेच व्हिडिओ कॉल करुन अश्लील कृत्य करत होता.

शिकविण्याच्या नावाखाली आरोपी मुलींच्या शरिराला हेतुपूरस्सर चुकीच्या ठिकाणी हात लावत होता. अनेकवेळा मुलींचा पाठलाग करत त्यांच्या घरी जाऊन त्यांना फिरायला बोलवत होता. त्याच्या मैत्रिणीने यामध्ये त्याला मदत केल्याचा आरोप आहे. तिने एका पीडित मुलीचे व्हॉटसप स्कॅन करुन आरोपी गावडे बरोबर आक्षेपार्ह संभाषण केले होते. या प्रकारामुळे संबंधित मुलीने क्लासला जाणे बंद केले होते.

पीडित मुलींनी मानसिक त्रास झाल्याने त्यांनी हा प्रकार घरच्यांना सांगितला. बुधवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात
आरोपी पोलीस समाधान गावडे आणि त्याची मैत्रीण या दोघांवर विनयभंग (Molestation), बालकांचे लैंगिक
अपराधापासून संरक्षण (पोक्सो) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित मुलींच्या जाबाबनंतर आरोपींवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे,
अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे (Senior PI Vilas Supe) यांनी दिली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kirloskar Cummins Employees Union | कामगार चळवळीला जिवंत ठेवण्याची आवश्यकता; यशवंत भोसले यांचे प्रतिपादन