Dilip Walse Patil | गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांच्या सचिवाच्या गाडीतून रोख रक्कमेसह बॅग चोरीला

फलटण : पोलीसनामा ऑनलाइन – Dilip Walse Patil | राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्या खासगी सचिवाला चोराने चांगलाच दणका दिल्याचे समोर आले आहे. गृहमंत्री पाटील यांचे खासगी सचिव बाबासाहेब शिंदे (Private Secretary Babasaheb Shinde) यांच्या गाडीतून रोख रक्कमेसह बॅगच चोरीला (Theft) गेल्याची घटना घडली. ही घटना सातारा (satara) जिल्ह्यातील फलटण (Phaltan News) येथे घडली असल्याचे समोर आले. चक्क गृहमंत्र्यांच्या सचिवाच्या गाडीत चोरी झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

 

खासगी सचिव बाबासाहेब शिंदे (Private Secretary Babasaheb Shinde) हे फलटणमध्ये धुळदेव इथं 10 डिसेंबर रोजी एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर शिंदे हे परतीच्या प्रवासाला निघाले होते. दरम्यान, कारची काच फोडल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कारची पाहणी केली असता एक बॅग आणि रोख रक्कम कुणी तरी चोरी केल्याचे लक्षात आले. चोरीला गेलेल्या बॅगेत महत्त्वाची कागदपत्रे होती, अशी माहिती समजतेय.

 

दरम्यान, चोरी झाल्याचे लक्षात येता खासगी सचिव शिंदे यांनी तातडीने फलटण शहर पोलीस ठाण्यात (Phaltan City Police Station) तक्रार केली.
दरम्यान, गृहमंत्र्यांच्या (Dilip Walse Patil) सचिवाची बॅग चोरीला गेल्याची घटना घडल्यामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
याप्रकरणी आता पोलिस शोध घेत आहेत.

 

Web Title :- Dilip Walse Patil | home minister dilip walse patils secretary balasaheb shindes bag stolen from the car at faltan of satara district

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा