Dipa Karmakar | भारताच्या ‘या’ महिला जिम्नॅस्टपटूचे 21 महिन्यांसाठी निलंबन; उत्तेजक द्रव्य चाचणीत आढळली दोषी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – क्रीडा विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताची अव्वल दर्जाची महिला जिम्नॅस्टपटू दीपा कर्माकर (Dipa Karmakar) हिला उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी आंतरराष्ट्रीय टेस्टिंग संघटनेकडून दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी तिच्यावर कारवाई करण्यात आली असून तिला 21 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. (Dipa Karmakar)

काय आहे नेमके प्रकरण?
2021 मध्ये स्पर्धेपूर्वी खेळाडूंच्या होणाऱ्या उत्तेजक द्रव्य चाचणीत दीपाने हायजेनामाइनचे सेवन केल्याचे आढळून आले होते. यामुळे तिला या प्रकरणी दोषी ठरवून तिला तिला 21 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले असल्याचे आंतरराष्ट्रीय टेस्टिंग संघटनेकडून सांगण्यात आले आहे. दीपावर ही निलंबनाची कारवाई 2021 च्या ऑक्टोबर महिन्यात पासूनच सुरु झाल्यामुळे 10 जुलै 2023 रोजी तिला देण्यात आलेली निलंबनाची शिक्षा संपणार आहे.

कोण आहे दीपा कर्माकर?
दीपा कर्माकर (Dipa Karmakar) ही मूळची त्रिपुराची आहे. भारतातील टॉप जिम्नॅस्टमध्ये तिची गणना केली जाते. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ती चौथ्या स्थानावर राहिली होती. चौथ्या स्थानापर्यंत मजल मारणारी दीपा ही भारताची पहिलीच खेळाडू ठरली होती. यानंतर दीपाने 2018 मध्ये तुर्कीमधील मर्सिन येथे झालेल्या FIG आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपच्या व्हॉल्ट स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले, अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली जिम्नॅस्ट ठरली. यामुळे तिला सर्वत्र ‘गोल्डन गर्ल’ म्हणून ओळख मिळाली.

हायजेनामाइन म्हणजे काय?
युनायटेड स्टेट्स अँटी-डोपिंग एजन्सी (यूएसएडीए) नुसार, हायजेनामाइनमध्ये मिश्रित अ‍ॅड्रेनर्जिक रिसेप्टर क्रियाकलाप आहे.
ते सामान्य उत्तेजक म्हणून कार्य करते. 2017 मध्ये WADA च्या प्रतिबंधित पदार्थांच्या यादीमध्ये हायजेनामाइनचा समावेश करण्यात आला. याच द्रव्याचे सेवन केल्यामुळे दीपा कर्माकर हिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Web Title :- Dipa Karmakar | indian gymnast dipa karmakar banned for 21 months for failing dope test

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad ACB Trap | कृषी सेवा केंद्राचा मासिक हप्ता देण्यासाठी लाचेची मागणी, कृषी अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Devendra Fadnavis | आर्ट ऑफ लिव्हींगने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी पुसण्याचे कार्य केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस