Discussion In Maharashtra Politics | अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला दिग्गजांची उपस्थिती?; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने दिले संकेत

मुंबई : Discussion In Maharashtra Politics | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा (Shivsena MLA Disqualification Case) निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विलंब करत असल्याने दोनच दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत वेळेचे बंधन घालून दिले आहे. यामुळे आगामी दोन आठवड्यात अध्यक्षांना निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे. या निर्णयात जर मुख्यमंत्र्यांसह शिवसेना शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरले तर…मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) होणार, अशी चर्चा सध्या राजकारणात रंगली आहे. (Discussion In Maharashtra Politics)

यापूर्वीही राष्ट्रवादीच्या आमदारांकडून अशी वक्तव्ये करण्यात आली होती. त्यातच, गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी घरातील गणपती बाप्पांसमोर अजित पवार मुख्यमंत्री पदाची शपथ घेतानाचा देखावा साकारला आहे. हा देखावा शिंदेंची गच्छंती होऊन अजित पवार मुख्यमंत्री होतील, असेच सूचित करत आहे. (Discussion In Maharashtra Politics)

गणपती बाप्पांसमोरील या शपथविधी देखाव्यात अजित पवार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना दिग्गज मोठ्या
प्रमाणात उपस्थित असल्याचे दिसत आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, शरद पवार,
रामदास आठवले, राहुल गांधी, फडणवीस, एकनाथ शिंदे, राज आणि उद्धव ठाकरे, संभाजी राजे, सुप्रियाताई दिसत आहेत.

या काल्पनिक शपथविधी सोहळ्याच्या देखाव्यात महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान,
रजनीकांत यांची उपस्थित आहे. तसेच मराठमोळे अभिनेते अशोक सराफ, सचिन पीळगावकरही आहेत.
हा देखावा काल्पनिक असला तरी त्याचा आगामी राजकारणाशी संबंध असल्याची चर्चा रंगली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sandeep Khardekar | महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती