Sandeep Khardekar | महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sandeep Khardekar | आगामी काळात महायुतीतील सर्व घटक पक्षांशी योग्य समन्वय राखण्यासाठी भाजपचे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) यांची पुणे शहर महायुतीच्या समन्वयक पदी (Co-ordinator of Mahayuti) नियुक्ती करण्यात आली.

आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष धीरज घाटे, यांच्या हस्ते खर्डेकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी आ. माधुरी मिसाळ, आ. भीमराव तापकीर, आ. सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ,प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे,पुणे शहर प्रभारी अमर साबळे,माजी अध्यक्ष जगदीश मुळीक, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

महायुती चे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,
राष्ट्रीय समाज पक्ष,लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम संघटना, पतीत पावन संघटना यासह विविध समविचारी पक्ष,संघटना, स्वयंसेवी संस्था, यांच्याशी योग्य समन्वय साधून, सर्वांच्या सहकार्याने आगामी लोकसभा,विधानसभा व महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवू असा विश्वास संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) यांनी व्यक्त केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | विसर्जन हौदाची पाहणी करताना आरोग्य कर्मचाऱ्याला वीजेचा धक्का, दोन्ही पाय जळाले; हॅपी कॉलनीतील घटना

MLAs Disqualification Case | आमदार अपात्र प्रकरण! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना,
शिंदे गटाचे आमदार म्हणाले…

Pune PMC News | पुणे महापालिकेचा अजब कारभार, करार न करताच चार्जिंग स्थानके उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी

Supriya Sule | महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या-‘2029 च्या आधी…’ (व्हिडिओ)