नात्याला काळीमा फासणारी घटना : आजे सासऱ्याने केला नात सूनेचा विनयभंग

मालेगाव : पोलीसनामा आॅनलाइन – नात्याने आजे सासरा असलेल्या ७० वर्षीय वृद्धाने त्याच्या २२ वर्षीय नात सुनेचा विनयभंग करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याने आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहितेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. नयापुरा सुलेमानी मशिदीजवळ २१ एप्रिल व ४ ऑगस्ट २०१८ रोजी ही घटना घडली.
पीडित महिला आपल्या आजे सासऱ्यांना त्यांच्या रुममध्ये दूध देण्यासाठी गेली असता त्यांनी तिच्या अंगावरील ओढणी ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. एकदा अशाप्रकारचे कृत्य करूनही हा नराधम थांबला नाही. त्याने दुसऱ्यांदा ऑगस्ट महिन्यातही दूध देण्यास गेली असता अश्लील भाषेत बोलून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक नांद्रे अधिक तपास करीत आहेत.
गळफास घेऊ शिक्षकाची आत्महत्या
सिन्नर : गळफास घेऊन शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील विंचूर दळवी येथे घडली. योगेश विश्वनाथ शेळके (३३) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. योगेश शेळके हे नूतन विद्यामंदिर, भगूर येथे कार्यरत होते. घरी कुणी नसताना त्यांनी घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

याबाबत गावातील एका व्यक्तीने सिन्नर पोलिसांना फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उंची मोजण्याच्या बहाण्याने विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक