पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने शेकडो निराधारांना ब्लॅंकेट वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चोर पावलांनी येणाऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांची मदत घ्यावी लागते; परंतु काही लोकांना तेही मिळत नसल्याने त्यांच्या नशिबी कडाक्याच्या थंडीत कुडकुडणेच येते. समाजातील अशाच काही वंचित, भीक मागून खाणारे मनोरुग्ण, बेघर गरीब कामगार, दिव्यांग बांधव यांना जात, धर्म, भाषा याच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्म जोपासण्याच्या हेतूने पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने थंडीपासून बचाव व्हावा म्हणून ब्लॅंकेट वाटप करून मायेची ऊब दिली आहे.

यावेळी संस्थापक/अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, युवक अध्यक्ष शुभम चिंचवडे, शहराध्यक्ष भाग्यदेव एकनाथ घुले, उपाध्यक्ष दत्ता घुले, दापोडी अध्यक्ष राजाभाऊ काटे, सामाजिक कार्यकर्ते विकास पवार, सामाजिक कार्यकर्ते सागर पाडाळे, मुकेश चौधरी, दत्तात्रय बाळू घुले, रोहिदास जोशी, अभिषेक घोगे, दत्ता घुले, नामदेव गोळे आदी उपस्थित होते.

रात्रीच्या सुमारास थंडीत कुडकुडणाऱ्या निराधारांना अचानक अडचणीच्या वेळी मिळालेल्या या मदतीच्या हातामुळे अनेक गरजवंतांनी शहराध्यक्ष भाग्यदेव एकनाथ घुले यांच्याकडे आनंद व्यक्त केला.