सार्थक सेवा संघ सासवड येथे सोलर रुफटॉप सिस्टिम व सोलर वॉटर हिटर वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – रोटरी क्लब पाषाण मार्फत अनाथ मुलांचे वसतिगृह सार्थक सेवासंघ सासवड येथील मुलांना सोलर रुफटॉप सिस्टिमची यंत्रणा बसवून देण्यात आली.या सयंत्राचा खर्च तीन लाख पन्नास हजार रुपये इतका आहे. याचे उद्घाटन माजी अध्यक्ष प्रदीप मुळे व अंजली मुळे या दांपत्याने केले.या सयंत्रासाठी सूर्याटेक सोलर सिस्टिम यांनी अतिचय माफक दरात अतिचय उत्तम अशी सोलर रुफ टॉप सिस्टिम दिलेली तर आहेच त्याशिवाय कंपनीने पुढाकार घेवून मुलींच्या वसतीगृहासाठी ५०० लिटरचे सयंत्र सुद्धा मोफत बसवून दिले आहे.

सूर्याटेक कंपनीचे मालक मुकुंद कमलाकर हे सुद्धा रोटेरियन आहेत. या सयंत्रामुळे सार्थक सेवा संघ येथे दररोज किमान २० युनिट्स एव्हडे तयार होणार असून त्यामुळे संस्थेचा संपूर्ण पुढील किमान २५ वर्षासाठीचा विद्युत बिल भरण्याचा खर्च वाचणार आहे. एका वर्षात या सिस्टिम मार्फत आंदजे १०० वृक्षांची निर्मिती करण्या एव्हडा पर्यावरणाचा लाभ होईल असे मुकुंद कमलाकर यांनी नमूद केले.