पुणे दिवाणी कोर्टात ‘स्काईप’द्वारे मिळाला घटस्फोट

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

घटस्फोट हवा असेल तर खूप मोठ्या प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. अनेक वेळा कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. मात्र आता पुणे दिवाणी न्यायालयानं ही जुनी परंपरा मोडीत काढत स्काईपद्वारे परदेशात राहणाऱ्या पतीचा जबाब घेऊन घटस्फोटाला मंजुरी दिली.
[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’69847cf5-8cf0-11e8-b5b4-bf6eba4db0f6′]

पुण्यातील दिवाणी न्यायालयात सॉफ्टवेयर इंजिनियर  दाम्पत्यानं घटस्फोटासाठी अर्ज केला होता आणि या घटस्फोटाच्या केसमध्ये परदेशात राहणाऱ्या पतीचा जबाब ऑनलाईन घेण्यात आला. या दांपत्याने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. परंतु पती विदेशात असल्यामुळे तो भारतात येऊन जबाब देऊ शकत नव्हता. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्स अॅप स्काईपद्वारे पतीशी संपर्क साधून त्याचा ऑनलाईन जबाब घेतला.

नेदरलँड येथील हेग मध्ये असलेल्या ३५ वर्षीय पतीला जबाब देण्यासाठी भारतात येणे अश्यक्य होते. त्याने न्यायालयात व्हॉट्सअॅप किंवा स्काईप या अन्य माध्यमातून जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने पतीची मागणी मान्य करुन स्काईपद्वारे जबाब देण्याची परवानगी दिली.
[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’705af92a-8cf0-11e8-873b-cd0ce20c2813′]

२७ वर्षीय महिला पुण्यातील रहिवाशी आहे. दोघे पती-पत्नी सॉफ्टवेयर इंजिनियर आहेत. २० ऑगस्ट २०१४ ला त्यांचा प्रेम विवाह झाला होता. लग्नानंतर ते दोघे काही दिवस हैद्राबाद येथे राहिले होते. त्यानंतर ते बेंगलोरला शिफ्ट झाले. तेथून ते पुण्यात स्थायीक झाले. दरम्यान, दोघामध्ये मतभेद झाल्याने एप्रिल २०१६ मध्य त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर पती नेदरलँड येथील हेग मध्ये स्थायीक झाला. या दोघांच्या संमतीने न्यायालयाने हा निर्णय घेतला.