40 तासांपर्यंत ‘ज्वलंत’ राहिला हा मातीचा दिवा, ज्या कुंभाराने बनवला त्याला यासाठी येताहेत ‘कॉल’

छत्तीसगढ : दिवाळी येत आहे, यापूर्वी मार्केटमध्ये विविध प्रकारचे दिवे येऊ लागले आहेत. अशावेळी छत्तीसगढमधून एक आगळा-वेगळा दिवा समोर आला आहे. हा दिवा एक-दोन नव्हे, तर तब्बल 24 ते 40 तासांपर्यंत जळत राहातो. हा दिवा समोर आल्यानंतर मार्केटमध्ये त्याची डिमांड वाढली आहे. छत्तीसगढच्या कोंडागावमध्ये राहाणारे शिल्पकार अशोक चक्रधारी यांनी हा दिवा बनवला आहे.

अशोक चक्रधारी यांना 40 तासापर्यंत लागोपाठ जळणार्‍या या मातीच्या दिव्यासाठी नॅशनल मेरिट अ‍ॅवार्ड प्रमाणपत्राने सुद्धा सन्मानित करण्यात आले आहे. अशोक चक्रधारी मागील अनेक वर्षांपासून मातीची भांडी बनवण्याचे काम करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, 35 वर्षांपूर्वी असा दिवा पाहिला होता. तोच लक्षात ठेवून त्यांनी दिवा बनवला.

अशोक चक्रधारी म्हणाले, मला यावर्षी नवरात्रीत कुणीतरी फोन करून सांगितले, की तुम्ही जो दिवा बनवला आहे, आम्हालाही तसा हवा आहे. मला समजले की, माझा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे लोक मला कॉल करत आहेत. आम्ही रोज 50-60 असे विशेष दिवे बनवत आहोत. आम्ही याची किंमत 200 ते 250 रुपये ठेवली आहे.

सर्वात हैराण करणारी बाब ही आहे की, अशोक चक्रधारी यांनाही समजले नाही की, त्यांचा हा व्हिडिओ आणि फोटो कसे वायरल झाले. लोक आता फोन करून शिल्पकार अशोक चक्रधारी यांच्याकडे दिव्याची मागणी करत आहेत. लोक सतत फोन कॉल करून मागणी करत आहेत. असंख्य लोकांनी दिव्यासाठी ऑर्डर दिली आहे आणि अ‍ॅडव्हान्स सुध्दा जमा केला आहे.

देशभरात 14 नोव्हेंबरला दिवसाळीचा सण साजरा केला जाणार आहे. दिवाळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीत दिव्यांची मागणी खूप वाढते.