Diwali 2020 : केवळ ‘ही’ 6 कामे केली तर या दिवाळीत चमकू शकते तुमचे ‘नशीब’

पोलिसनामा ऑनलाइन – दिवाळीचा सण आपल्यासोबत आनंद इत्यादी तर आणतोच, सोबतच एक आशा ही सुद्धा आणतो की, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पैशासंबंधी सुरू असलेल्या अडचणी नष्ट व्हाव्यात आणि लक्ष्मी मातेची कृपा प्राप्त व्हावी. परंतु, केवळ अपेक्षा करून इच्छा पूर्ण होत नाही. धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावेत हे आपण जाणून घेणार आहोत. हे उपाय वास्तुशास्त्राशी संबंधीत आहेत. वास्तूतज्ज्ञ सांगतात की, वास्तूशास्त्रात असे उपाय सांगितले गेले आहेत जे केल्याने दिवाळीत तुमची रिकामी तिजोरी भरू शकते.

बहुतेक लोकांना माहिती असते की, ज्या घरात वास्तूशास्त्राशी संबंधीत दोष असतात, अशा घरातील पैशाशी समस्या कधी संपत नाहीत आणि घरातील सदस्य जीवनात कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. वास्तूदोष असेल तर कोणतीही तोडफोड न करता तो ठिक करता येतो.

हे उपाय करा

1 अमावस्येला साफ-सफाई
प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येच्या तिथीला दिवाळी सण साजरा केला जातो. यासाठी या दिवसाचे अतिशय महत्व आहे. या दिवसाचा संबंध वास्तूशास्त्राशी सुद्धा जोडलेला आहे. होय, यामध्ये सांगितलेल्या उपायानुसार दिवाळीपूर्वी लोक आपल्या घरांची साफ-सफ़ाई करतात. मात्र, अमावस्येच्या दिवशीसुद्धा घराची चांगल्याप्रकारे साफ-सफाई केली पाहिजे. असे केल्याने घरासोबत जीवनातूनही निगेटिव्हिटी दूर जाते.

2 सात क्रिस्टल ठेवा
वास्तुशास्त्रात म्हटले आहे की, घर नेहमी स्वच्छ असल्यास तिथे सकारात्मकता नेहमी निवास करते. ही सकारात्मकता काय ठेवण्यासाठी कोणते उपाय करावेत, ते जाणून घेवूयात. वास्तुतज्ज्ञ सांगतात की, घराच्या उत्तरपूर्व दिशेला 7 क्रिस्टल ठेवल्याने घरात सकारात्मकता वाढते. सोबतच धनाचे आगमन होते.

3 करनक घारा यंत्र स्थापन करा
याशिवाय यावेळी दिवाळीच्या दिवशी म्हणजे कार्तिक मासातील अमावस्येच्या शुभ मुहूर्तात तसेच जेव्हा पुष्य नक्षत्र असेल तेव्हा घर आणि कार्यालयात उत्तरेच्या दिशोला पूजा जरूर केली पाहिजे. पूजा केल्यानंतर करनक घारा यंत्र स्थापन करा, असे मानले जाते की, यामुळे धन अ‍ॅट्रॅक्शन वाढते. म्हणजे पैशात बरकतीसह धन आगमनाचे नवे मार्ग खुले होतात.

4 चांदीच्या वाटीत मोती
धनत्रयोदशीच्या अगोदर म्हणजे दिवाळीच्या एक दिवस अगोदर शुभ मुहूर्तात घराच्या उत्तर दिशेला चांदीच्या वाटीत मोती टाकून ठेवावा, यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात धनवृद्धी होते.

5 महालक्ष्मी अष्टमीचा पाठ
याशिवाय दिवाळीपूर्वी येणार्‍या गुरूवारच्या दिवशी घरात महालक्ष्मी अष्टमीचा पाठ करावा.

6 बांबूची एक जोडी
धनत्रयोदशीला शक्य असल्यास बांबूची एक जोडी घेऊन त्यास लाल धाग्याने बांधून, घराच्या मुख्य दरवाजाच्या अगदी समोरच्या भिंतीवर टांगून ठेवा, यामुळे पॉझिटिव्हिटी वाढते.