Diwali Pahat In Yerawada Jail | येरवडा कारागृहातील कैद्यांच्या सुरेल आवाजात ‘दिवाळी पहाट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Diwali Pahat In Yerawada Jail | येरवडा कारागृहातील बंदी कलाकारांनी गुरुवारी (दि.10) ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमादरम्यान बंद्यांनी सुरेल आवाजात गाणी सादर केली. त्यांच्या सुमधूर गायनाने यावेळी उपस्थित मंत्रमुग्ध झाले. बंद्यांनी चला आळंदीला जाऊ…, या रे नाचु प्रेमानंदे.., हे अभंग व शोधीशी मानवा… यासारखी भावगीत सादर केली. त्यानंतर बंद्यांकरीता विविध पदार्थांचे दिपावली फराळ देण्यात आला. यावेळी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य पुणे अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) यांनी बंद्यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. (Diwali Pahat In Yerawada Jail)

यावेळी कारागृह अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी देखील दिपावली फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कारागृह अधिकारी व कर्मचारी यांना दिपावलीच्या शुभेच्छा देऊन उत्साह वाढवला. या कार्यक्रमाला अधीक्षक सुनील ढमाळ, उप अधीक्षक बी.एन.ढोले, पल्लवी कदम, रविंद्र गायकवाड, मगेश जगताप, आनंदा कांदे आदी उपस्थित होते. (Diwali Pahat In Yerawada Jail)

अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा,
महाराष्ट्र राज्य पुणे अमिताभ गुप्ता यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह मुख्यालय) डॉ.जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग, पुणे स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Kesari | सिकंदर शेख नवा महाराष्ट्र केसरी! प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेवर अवघ्या साडेपाच सेकंदात मात

Pune Sinhagad Road Crime News | बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना सिंहगड रोड पोलिसांकडून अटक,
4 पिस्टल 8 काडतुस जप्त