Pune Sinhagad Road Crime News | बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना सिंहगड रोड पोलिसांकडून अटक, 4 पिस्टल 8 काडतुस जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Sinhagad Road Crime News | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना अटक करुन त्यांच्याकडून पिस्टल आणि जिवंत काडतुस जप्त केले आहे (Pistol Seized) . त्यांच्याकडून एक लाख 60 हजार रुपये किंमतीचे 4 पिस्टल आणि 4 हजार रुपयांचे 8 काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई हिंगणे खुर्द (Hingne Khurd Pune) कॅनोल रोडवर केली आहे. (Pune Sinhagad Road Crime News)

सिद्धेश संतोष पाटील (वय-28 रा. जाधवनगर, वडगाव-बुद्रुक मुळ रा. पो. केंबुर्ली, ता. महाड, जि. रायगड), विकास सुभाष सावंत (वय-26 रा. जाधवनगर, वडगाव बु. मुळ रा. सावंतवाडी, पो. लव्हरी, ता. केज, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Pune Sinhagad Road Crime News)

सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार देवा चव्हाण व सागर शेडगे यांना माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी सिद्धेश पाटील व त्याचा मित्र विकास सावंत यांच्याकडे गावठी पिस्टल असून ते दोघे हिंगणे खुर्द येथील कॅनोल रोडच्या बाजूला पाईप लाईनवर बसले आहेत. पोलिसांनी खात्री करुन दोघांना शिताफीने पकडले. त्यांची अंगझडती घेऊन दोघांकडून 4 पिस्टल व 8 जिवंत काडतुसे असा एकूण 1 लाख 64 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील,
पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 सुहेल शर्मा, सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन,
पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी,
सहायक पोलीस फौजदार आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार संजय शिंदे, राजु वेंगरे, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास पांडोळे, अमोल पाटील, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, दक्ष पाटील, स्वप्नील मगर, विकास बांदल, अविनाश कोंडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | आकर्षक मोबदल्याचे आमिष दाखवून पावणे पाच कोटींची फसवणूक,
पुण्यातील रविनंदा डेव्हलपर्सच्या व्यवस्थापकासह तिघांवर FIR