आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना फराळाचे वाटप

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाइन –  आधार माणूसकीचा समाजसे संस्थेच्या वतीने तालुक्यातील चाळीस खेडयातील शंभर कुटूंबियांच्या घरी जाऊन दिवाळीचा फराळ देऊन दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न ” आधार माणूसकीचा ” या सेवाभावी संस्थेच्या वतीने करप्यात आले.

तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना आरोग्य व शिक्षणासाठी हातभार लाण्याचे काम “आधार माणूसकीचा” या सेवाभावी संस्थेच्या वतीने अॅड. संतोष पवार, धनराज पवार, अनंत निकते करीत असतात. शासकीय योजनांची माहिती त्यांना सांगतात.
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने गुरुवारी आधार माणूसकीचा स्वयंसेवी संस्थेचे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या झोपडीवर जाऊन फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी अॅड. संतोष पवार, रामकृष्ण पवार, एस. के. निर्मळे, नागेश औताडे, युवराज औताडे उपस्थित होते.

डोंगराळ भागातील पोलेवाडी येथे श्रीमती रेणूका शिवाजी बिडगर यांना फराळाचे देण्यात आले . त्यांनी सांगितले दोन मुले व एक मुलगी शालेय शिक्षण घेत आहे. बारा वर्षापूर्वी मालकाने आत्महत्या केली. अज्ञानामुळे त्याची शासन दरबारी नोंद नाही. त्यामुळे शासनाची कोणतीच मदत मिळाली नाही. गावाकडे जाण्यासाठी रस्ताही खडकाळ आहे.
त्यानंतर डोंगर पट्ट्यातील मंगईवाडी येथे दीड एकर शेत असलेली व शेतात कुड करून रहाणाऱ्या
श्रीमती संजीवनी रामदास शिंदे यांना चिवडा, लाडू देण्यात आले. यावेळी त्यांचा मुलगा राहूल (इयत्ता नववी) आणि जयश्री (आकरावी) उपस्थित होते.

जयश्रीला योगेश्वरी शिक्षण संस्येने आकरावीला मोफत प्रवेश दिला आणि मुलींच्या वसतिगृहात निवास व भोजनाची मोफत व्यवस्था केली, असल्याचे सांगण्यात आले. राहूलला अभ्यासाची आवड आहे, भरपूर शिकून मोठे व्हायचे, असे तो म्हणतो.
रहायला चांगले घर नाही, असे सांगून संजीवनी शिंदे म्हणाल्या, काही दिवसांपूर्वीच आमच्या घरात मोठा जाड साप निघाल्याचे सांगितले. शेतात मजुरी करून उपजिवीका भागवितात, असेही त्यांनी सांगितले.

चिचखंडीच्या डोंगर पायथ्याला राहणाऱ्या शानेश्वरी विष्णू गडदे यांनाही फराळाचे साहित्य देण्यात आले. यावेळी त्यांचा दीड वर्षाचा मुलगा व तीन वर्षाची मुलगी त्यांच्या सोबत होती. त्यांची सासू सुमित्रा गडदे, त्यांची आई इंदिरा चौधरी उपस्थित होत्या.

श्रीमती ज्ञानेश्वरी म्हणाल्या ,मालकांनी कर्जबाजारीपणामुळे दोन वर्षापूर्वी आत्महत्या केली. त्यांची सासू सुमित्रा म्हणाल्या, सहायला घर नाही. रेशनकार्ड, वीज, विहीर , घरकुल , स्वच्छतागृह नाही . सरकारी योजना आमच्या पर्यंत येत नाही . पाऊस कमी झाल्याने पिक पाणी नाही . जनावरांना चारा पाणी कोठून आणणार ?आता उसतोड करण्यासाठी जायचे आहे .
चिचखंडी येथील मागील वर्षात आत्महत्या केलेला

शेतकरी ( कै .) नामदेव तुकाराम गडदे यांच्या घरी त्यांची पत्नी श्रीमती राजमती नामदेव गडदे यांना फराळाचे सामान दिले . त्यांनी सांगितले , एक मुलगी विवाहित आहे . तीन मुले शिक्षण घेत आहेत .दीड वर्षापूर्वी आपल्या पतीने पन्नास हजार कर्जाच्या बोजामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले . घरकुल नाही , सरकारी मदत नाही . दुष्काळी परिस्थितीमुळे आता आपण उसतोड करण्यासाठी भावासोबत कर्नाटकात जात असल्याचे सांगितले .

राज्य शासनाने अंबाजोगाई तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर केला आहे .तालुक्यातील डोंगर पट्ट्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे .जनावरांना चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे . त्यात आत्महत्याग्रस्त्य शेतकऱ्यांच्या कुटुंबियाकडे शासनाचे व समाजाचे दुर्लक्ष होत आहे . त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज आहे .