मासिक पाळी आणि माइग्रेन या दोघांचा एकमेकांशी काही संबंध आहे का ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मासिक पाळी आणि माइग्रेन या दोघांचा एकमेकांशी काही संबंध आहे का ? तर मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या हार्मान्सच्या चढ उतारामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. पाळीच्या 2 दिवस अगोदर किंवा पाळी आल्यानंतर मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. या दरम्यान स्त्रियांच्या शरीरातील इस्ट्रोजन हार्मोनची पातळी कमी झाल्याने मायग्रेनचा त्रास होतो. विशेषत: इस्ट्रोजेनची पातळी बदलणे संभाव्यत: रक्ताभिसरण, न्यूरोट्रांसमीटर, रक्तवाहिन्या आणि रक्तदाबांवर परिणाम करते आणि ते सर्व संतुलनावर परिणाम करतात. यामुळे मायग्रेन देखील होतो.

मायग्रेनमध्ये डोकं दोन्ही बाजूंनी किंवा कधी कधी एका बाजूने दुखते. या वेदना तीव्र असतात. अर्धशिशीचा त्रास जेव्हा होतो तेव्हा रक्तप्रवाह वाढलेला असतो त्यामुळे खूप वेदना होतात. बर्‍याचदा मासिक पाळी दरम्यान मायग्रेनचा त्रास होतो. हार्मोन्सच्या पातळीतील चढ उतार हे मायग्रेनचे मुख्य कारण आहे.

वेगवेगळ्या अभ्यासानुसार असेही निदर्शनास आले आहे की मासिक पाळी दरम्यान येणारे मायग्रेन हे पाळीशी संबंधित आहे. या व्यतिरिक्त, माइग्रेनला कारणीभूत ठरणारे इतर घटक म्हणजे ताणतणाव, थकवा, मद्यपान, तीव्र प्रकाशाचा संपर्क, मोठा आवाज, हवामान, टायरामाइनयुक्त पदार्थांचे सेवन इत्यादी.

मायग्रेनचे व्यवस्थापन कसे कराल ?
ओव्हर-द-काउंटर (ओटीसी) औषधोपचार :
आपले डॉक्टर आपल्याला अशी काही औषधे लिहून देतील ज्यामुळे आपल्याला त्या त्रासदायक वेदनापासून आराम मिळू शकेल. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम देखील घ्यावे लागतील.

तणावातून मुक्त रहा : ताण व चिंता व्यवस्थापित करणे ही काळाची गरज आहे. तणावमुक्त राहण्यासाठी योग आणि ध्यान या सारख्या पर्यायांचा आधार घ्या. त्याचप्रमाणे, आपण प्राणायम करणे देखील फायदेशीर ठरु शकेल.

दररोज व्यायाम करा : व्यायाम केल्याने आपल्याला निरोगी राहण्यास मदत होईल. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्यास संप्रेरकांमुळे होणा-या मायग्रेनपासून मुक्तता मिळते. शिवाय, भरपूर पाणी पिऊन हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे.

डॉ. माधुरी बुरांडे लाहा (सल्लागार प्रसुती व स्त्रीरोग तज्ञ, मदरहुड हॉस्पीटल, पुणे)

टीप – मनाने औषधोपचार करू नका. वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.