मोमोज खाताय ! हे वाचल्यानंतर तुम्ही पुन्हा कधी मोमोजला हात लावणार नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वांना मोमोज खायला खूप आवडत कोणाला नॉन व्हेज तर कोणाला व्हेज मोमोज आवडतात. तळलेले मोमोजची किंमत वेगळी असते. तर उकडलेल्या मोमोजची किंमत वेगळी. मोमोजमध्ये जितके प्रकार आहेत. त्याहून जास्त खाणाऱ्यांची आवडी निवडी आहेत. आम्ही जे सांगणार आहोत. ते वाचल्यावर कदाचित नंतर तुम्ही मोमोज खाण सोडून द्याल.

मोमोज हे तळलेली आणि उकडलेले सुद्धा असतात. मैद्यापासून मोमोज बनतात आणि मैद्यात एजोडीकार्बोनामाइड, एलोक्सन, बेंजोइल पॅरॉक्साइडसारखे तत्व असतात. यामुळे मैदा सॉफ्ट व्हायला मदत होते. या तत्त्वांमुळे तुमच्या शरीरातील पँक्रियाजचे नुकसान होऊ शकते. यामुळे शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण वाढतं. यामुळे मधुमेह होऊ शकतो.

मोमोज बनवण्यासाठी ज्या चिकन मांसचा वापर केला जातो, त्याची गुणवत्ताही फार खराब असते. अधिकतर मोमोजमध्ये वापरण्यात येणाऱ्या चिकनमध्ये ई- कोलाई हा बॅक्टेरिया असतो. या बॅक्टेरियामुळे तुम्ही आजारी पडू शकता. जर खराब किंवा जास्त दिवस ठेवलेले चिकन वापरल्यास खाणाऱ्याला उलट्या होऊ शकतात.

मोमोजसोबत दिली जाणारी चटणी फार तिखट असते. अनेकांना तिखट चटणी खायला आवडतं. काही प्रमाणात ते शरीरासाठी चांगलंही असतं. मात्र अति तिखटामुळे पाइल्सही होऊ शकतो. एका सर्वेनुसार रस्त्यावरील पदार्थ खाल्ल्यामुळे डायरिया, फूड पॉयझन, पोट दुखीसारखे आजार होतात. रस्त्यावरील पदार्थांमध्ये सगळ्यात अपायकारक पदार्थ कोणता असेल तर तो आहे मोमोज. त्यामुळे मोमोज खाताना एकदा नक्की विचार करा.

आरोग्यविषयक वृत्त –