रुपया घसरला तरी घाबरू नका : अर्थमंत्री

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

रुपयाची किंमत घसरण्यामागे देशांतर्गत कारणे नसून आंतरराष्ट्रीय कारणे आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरत्या मूल्याने घाबरून जाण्याची गरज नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. दिल्लीत कॅबिनेट बैठकीनंतर जेटली पत्रकारांशी ते बोलत होते.

जेटली म्हणाले, डॉलरच्या तुलनेत सर्व चलन घसरत आहेत. उलट अशा वेळी रुपयाची किंमत एकतर कमी प्रमाणात घसरली आहे किंवा स्थिर राहिली आहे, हेही आपण लक्षात घ्यायला हवे. डॉलर मजबूत होण्याला अमेरिकेचे मजबूत धोरण कारणीभूत आहे. भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेला इतक्या लवकर घाबरण्याचे कारण नाही, असे म्हणत जेटलींनी उद्योजक, नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

जाहीरात 

राफेल करार, जनधन खाती याबाबत बोलताना अर्थमंत्री जेटली म्हणाले, काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याकडे राफेलविषयीच्या परिपूर्ण माहीतीचा अभाव आहे. सध्या राफेल विमाने ज्या किंमतीत भारताला मिळत आहेत, ती किंमत काँग्रेसच्या वेळी झालेल्या करारापेक्षा ९ टक्के कमी आहे. चलनातले बदल, फायटर जेटचे बदललेले तंत्रज्ञान आदींच्या तुलनेत इतक्या वर्षांच्या खंडांनंतरही हा करार २० टक्के स्वस्त आहे. जनधन खात्यांबाबत माहिती देताना जेटली म्हणाले, आतापर्यंत ३२.४१ कोटी खाती उघडण्यात आली आहेत. यापैकी ५३ टक्के खाती महिलांच्या नावावर आहेत. ५९ टक्के खाती ग्रामीण भागात उघडली आहेत. या खात्यांमध्ये आतापर्यंत ८१,२०० कोटी रुपये जमा झाले आहेत.

[amazon_link asins=’B00LHZW91A,B00LHZWD0C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5ad7b06a-b18d-11e8-bc21-0b4ea97487ff’]

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच