श्रीदेवी, माधुरीकडे ज्या नजरेनं पाहता त्या नजरेनं सनी लिअोनीकडे का पाहात नाही ? -हार्दिक पटेल

इंदूर : वृत्तसंस्था

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्र्या श्रीदेवी, माधुरी, नर्गिस यांच्याकडे ज्या नजरेने प्रेक्षक पाहतात, त्याच नजरेने सनी लिअोनीकडे का पाहात नाहीत, असा सवाल पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी विचारला आहे. ते इंदूरमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी हार्दिक यांनी म्हटले की, सनी लिअोनीकडे केवळ एक अभिनेत्री म्हणून का पाहिले जात नाही ? का प्रत्येक वेळी तिची पार्नस्टारची ओळख आडवी येते का. आपण नर्गिस माधूरी, आणि श्रीदेवी या अभिनेत्र्यांकडे ज्या नजरेने पाहतो तसेच सनी लिअोनीकडे का पाहू नये, असे अनेक सवाल हार्दिक पटेल यांनी उपस्थित केले आहेत. आपण जर हाच दृष्टीकोन चालू ठेवला तर देशात काहीच बदल होणार नाही. असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.

भाजप म्हणजे सत्ता लालची पार्टी आहे जर 2019 मध्ये निवडकांत नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर त्यानंतर देशात पुन्हा निवडणूका होणार नाहीत असे म्हणत हार्दिकने भाजपचा चांगलाच समाचार घेतला. ज्या पद्धतीने कर्नाटक निवडणुकांनंतर राज्यपालांनी बहुमत असतानाही काँग्रेस आणि जेडीएसला सत्तास्थापनेची संधी न देता भाजपाला बोलावलं, त्यावरुन देशात घटना संपवण्याची तयारी सुरू असल्याचा घनाघाती आरोप हार्दिक पटेल यांनी केला.