पूजा शैक्षणिक संकुलात नको, स्वतःच्या घरी घाला :  खा. सुप्रिया सुळे

पुणे : पोलीसनामा

 

महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा आहे तेव्हा ज्या काही पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला. पण अशा पूजा शैक्षणिक संकुलात नको, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. पूजा करण्याला आमचा विरोध नाही. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात सत्यनारायणाच्या पूजेवरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुळे यांनी हे वक्तव्य केले. पुण्यातील एका बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

[amazon_link asins=’B0748NPV86,B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0b2c319a-a822-11e8-ab81-f9e043a3f628′]

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांच्या समस्यांबाबत पुणे महापालिकेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्या बैठकीला महापालिका आयुक्त सौरभ राव आणि ग्रामस्थ होते. त्यानंतर पत्रकाराशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.

पुण्यातील फर्ग्युसन  महाविद्यालयात श्रावणमासानिमित सत्यनारायण पूजा करण्यात आली होती. या पूजेवरून वाद सुरू झाला आहे. काही विद्यार्थी संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे महाविद्यालय परिसरात तणावाचे वातवारण निर्माण झाले होते. यासंबंधीत खासदार सुळे यांनी ही परखड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महिल्यांवरील अत्याचाराच्या वाढलेल्या घटनांबाबत खासदार सुळे म्हणाल्या, महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. महिलांवरील प्रश्नांकडे मुख्यमंत्री गांभीर्याने पाहत नसून त्यांनी पक्षाच्या प्रचाराकडे कमी आणि महिलांच्या सुरक्षेकडे जास्त लक्ष द्यावे तसेच त्यांच्याकडे गृहमंत्रीपद असल्याने त्यांना जर ते जमत नसेल तर त्यांनी राज्याला स्वतंत्र गृहमंत्री द्यावा.

फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्यांच्या कार्यालयात सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यालयाबाहेर  असणाऱ्या फलकावर सर्व  विद्यार्थ्यांना पूजेचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले होते. या पूजेची माहिती विद्यार्थ्यांना मिळताच त्यांनी  प्राचार्यांना घेराव घालत जाब विचारला. मागील अनेक वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून सत्यनारायणाची पूजेचे आयोजन केले जात आहे, अशी माहिती प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. पूजेचे आयोजन करुन आम्ही अनेक वर्षांपासून सुरु आहे, असे ते म्हणाले.