महत्वाची गोष्ट ! मास्क लावल्याने श्वास घेण्यास त्रास होतोय? तर ‘हे’ सरळ मार्ग लक्षात ठेवा..

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   आजच्या कोरोना विषाणूच्या संकटात कोरोनापासून रोखण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करत आहेत. जसे कि, मास्क घालणे, सॅनिटायझर, हात स्वच्छ धुणे, सामाजिक अंतर आदी. तर कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मास्क घालणे अधिक आवश्यक आहे. तसेच अनेक लोक मास्क घालण्याने त्रास होतो म्हणून सांगतात. श्वास घेणे, अथवा गुदमरने अशा गोष्टी होत असतील तर एवढंच करा..

साधा आणि सरळ मार्ग कोणता?

–  प्रथम लक्षात घेणे की, मास्क वापरताना तुमचा श्वासोच्छवास कसा सुरू आहे. म्हणजेच तुम्ही नाकाने श्वास घेताय की तोंडाने. तोंडाने श्वास घेतल्याने श्वसन व्यवस्थित होत नाही. म्हणून अधिकाधिक नाकाने श्वास घेण्याचा प्रयत्न करणे.

–  मास्क लावून श्वास घेताना आपला हात पोटावर ठेवा. श्वास घेताना तुमचे पोट की छाती वरखाली होत आहे याचे निरिक्षण करा. आता हात पोटावर ठेऊन मास्क वापरतानाही श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. याचा वारंवार प्रॅक्टिस करत राहिल्याने तुम्ही मास्क वापरतानाही आणखी चांगल्या क्षमतेने श्वास घेऊ शकता.

–  मास्क लावल्यावर तुमचे शरीर निवांत राहू द्या. यासाठी तुम्ही विविध व्यायाम देखील करू शकता. ते बघा,

१. खांदे वर खाली करणे.

२. हात गोलाकार फिरवणे.

३. हातांना स्ट्रेच करणे.

४. कंबर एकदा उजव्या आणि दुसऱ्यांदा डाव्या बाजूला वाकवणे.

५. नियमित व्यायाम केल्याने तुमची श्वसन क्षमता वाढते.

–  मास्क व्यवस्थित लावणेही आवश्यक आहे. काही लोक मास्क चुकीच्या पद्धतीने वापरतात. त्यामुळे सुद्धा श्वास घेताना त्रास होऊ शकतो. यामधील गोष्टी बघा.

१. तुमचे पूर्ण तोंड आणि नाक झाकले जाईल अशा पध्दतीने मास्क वापरा.

२. अनेकांचा गैरसमज असतो. की मास्क वापरल्याने ऑक्सिजन कमी प्रमाणात शरीरात जातो. पण खऱंतर आपल्या मास्कमधून ऑक्सिजन अथवा कार्बन ३.

३. डायोक्साईड सहज आतबाहेर जाऊ शकतो. लक्षात घ्या विषाणू प्रवेश करू शकत नाहीत.

–  व्यक्ती मास्क काही वेळासाठी काढू शकते. याला ब्रीदिंग ब्रेक्स अर्थात श्वास तोडणे असे देखील म्हटले जाते. यामध्ये काही गोष्टी आहे.

१. ज्यावेळी व्यक्ती एखाद्या सुरक्षित जागेत असते. अर्थात जिथे गर्दी किंवा आजूबाजूला कोणी नसेल त्याचदरम्यान काही मिनिटांसाठी मास्क काढू शकणार आहे.

२. एकदा दोनदा श्वास-उच्छवास घ्या आणि पुन्हा मास्क लावा. खार तर मास्क वारंवार काढू नये.

–  व्यक्ती जेवढे पाणी प्याल अथवा सरबत आणि फळांचा रस असे द्रव पदार्थ घेते तेवढीच त्या व्यक्तीची मास्क लावूनही श्वास घेण्याची क्षमता वाढत राहते.