‘या’ विमानानं भारतात पोहचले डोनाल्ड ट्रम्प, चालतं-फिरतं ‘व्हाइट हाऊस’चं !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या कुटुंबासोबत भारतात पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प आणि मुलगी इवांका देखील आहेत. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प ज्या विमानातून भारतात आले त्या विमानाचे नाव आहे एअरफोर्स वन. अध्यक्ष ट्रम्प यांचे हे खास विमान चालते – फिरते व्हाईट हाऊस म्हणून देखील ओळखले जाते. बऱ्याच सुविधांनी सुसज्ज अश्या या विमानाला कोणता पक्षी स्पर्श देखील करू शकत नाही.

वास्तविक, एअरफोर्स वनची जबाबदारी प्रेसिडेंशियल एरलिफ्ट ग्रुपवर असते, हा ग्रुप व्हाइट हाऊस मिलिटरी ऑफिसचा एक भाग आहे. अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलीन डी. रुझवेल्ट यांच्या निर्देशानुसार 1944 मध्ये एरलिफ्ट ग्रुपची स्थापना राष्ट्रपती पायलट कार्यालय म्हणून करण्यात आली. या विमानाची खास ओळख म्हणजे त्यावर लिहिलेले यूनाइटेड स्टेट ऑफ अमेरिकासह अमेरिकेचा राष्ट्र ध्वज चित्र आणि राष्ट्रपतींचा शिक्का यांचा समावेश आहे. या विमानामधील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते नियमित विमानांच्या तुलनेत हवेमध्ये इंधन भरू शकते.

क्षेपणास्त्रांनी सुसज्ज :
हे विमान प्राणघातक लेजर आणि क्षेपणास्त्रांनी अद्ययावत आहे. जर शत्रूंचा हल्ला अपेक्षित असेल तर विमानातूनच क्षेपणास्त्र हल्ला केला जाऊ शकतो. जर शत्रूने या क्षेपणास्त्रास चकमा दिला तर विमानाच्या पंखात लपलेली मशीन गन गोळीबार करू शकते. अत्याधुनिक सुविधांसह हे विमान 70 मीटर लांबीचे आहे. या विमानात 4 हजार चौरस फूट जागा आहे. एअरफोर्स वन 965 किमी / तासाच्या वेगाने उड्डाण करू शकते. तसेच या विमानात सायबर हल्ले किंवा क्षेपणास्त्र हल्ले शोधण्यासाठी संरक्षण उपकरणे, रडार जैमर, रेडिओ ऍन्टिना आणि सेन्सर आहेत. धोका जाणवल्यास, विमानात असलेल्या एस्केप पॉडच्या म्हणजेच खास पद्धतीच्या कॅप्सूलच्या सहाय्याने राष्ट्रपतींना सुरक्षितपणे बाहेर काढता येऊ शकते. विमानात, राष्ट्राध्यक्षांकडे न्यूक्लिएटर शस्त्रे प्रक्षेपित करण्यासाठी देखील एक बटन आहे.

एअर फोर्स वन हे जगातील सर्वात सुरक्षित बोईंग 747 – 200 बी सीरिजचे विमान आहे. म्हणूनच याला चालते- फिरते व्हाइट हाऊस म्हटले जाते. अशी कोणतेही काम किंवा सुविधा नाही, जी या विमानात नाही. अत्याधुनिक सुरक्षा आणि दळणवळणाच्या साधनांव्यतिरिक्त, हवेमध्ये इंधन भरण्याच्या क्षमतेमुळे ते बर्‍याच तास सतत हवेत राहू शकते. या सर्व सुविधांव्यतिरिक्त, विमानामध्ये राष्ट्रपती कार्यालयाची सुविधा, आराम कक्ष आणि आवश्यकतेनुसार संपूर्णपणे सुसज्ज ऑपरेशन थिएटरची सुविधादेखील आहे.

महत्वाचे म्हणजे हे विमान एकटे उडत नाही. शत्रूला फसवण्यासाठी यासारखेच दुसरे विमान हवेमध्ये राहते. त्यात 76 लोक प्रवास करू शकतात. विमानाच्या क्रूमध्ये 26 सदस्य असतात, ज्यात 2 पायलट, फ्लाइट इंजिनियर, नॅव्हिगेटर आणि इतर क्रू असतात.

You might also like