100 Mbps इंटरनेट स्पीड करा डाऊनलोड

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन

कोणते ही नवे गाणे असो वा नवीन एखादा पिक्चर आला की तो हमखास डाऊनलोड केलाच जातो. इंटरनेट वापरात भारताचा जगात दुसरा क्रंमाक आहे. मात्र इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारताचा ७६ वा नंबर लागतो. भारतात इंटरनेट कनेक्टीव्हीटी असली तरी हवी तशी स्पिड अजून प्राप्त झालेली नाही. भारतकडून सन २०१८ आणि २०१९ मध्ये जी सॅट ११, जी सॅट-२९ आणि जी सॅट २० उपग्रह लाँच करण्यात येणार आहेत. त्यानंतर देशातील इंटरनेटचा स्पीड १०० जीबीपीएस होईल, असे हैदराबादमधील एका परिषदेत बोलताना, भारतीय स्पेस संशोधन संस्था (इस्रो)चे चेअरमन के. सिवन यांनी म्हटले आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’652e85f5-bfdf-11e8-96c9-7dfa3b75a627′]

डिजिटल इंडिया होणार अधिक गतीमान

लवकरच इस्रो जीसॅट-२० हे उपग्रह अंतराळात सोडण्यात येणार आहे. या सर्व उपग्रहांच्या प्रक्षेपणामुळे भारतातील इंटरनेटचा स्पीड १०० जीबीपीएस एवढी वाढणार आहे. त्यामुळे देशातील डिजिटल यंत्रणा गतीमान होईल. भारत सरकारकडून यासाठी १० हजार ९०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्याचे प्रक्षेपण, ३० पीएसएलव्ही आणि १० जीएसएलव्ही – एमके ३ या यानांमधून करण्यात येणार आहे. त्यासाठी ४ वर्षांचा कालावधी लागणार असून आणखी ५० स्पेसक्राफ्टचे लाँचिंग होणार आहे, असेही सिवन यांनी सांगितले. इस्रोकडून २०१७ मध्ये जीसॅट हा उपग्रह लाँच करण्यात आला होता. तर यंदा म्हणजेच २०१८ मध्ये जीसॅट-११ आणि जीसॅट-२९ हे उपग्रहाचे अंतराळात प्रक्षेपण करण्यात आले होते. इस्रोकडून मोठ्या प्रमाणात नवनवीन संशोधन सुरू असून अॅकॅडमिक आणि उद्योजकीय प्रगतीसाठी संस्थेकडून आधुनिक संशोधनावर भर देण्यात येत असल्याचेही सिवन यांनी म्हटले.

का घेत नाही मोदी-शहा ‘मनोहर पर्रीकर’ यांचा राजीनामा ?