Abhijit Panse | अभिजित पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची? भाजपच्या निर्णयाकडे लक्ष

मुंबई: Abhijit Panse | राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. यामध्ये शिवसेना (Shivsena) पक्षात पडलेली फूट आणि त्यांनतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेली फूट महत्वाची ठरली .

या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) मनसेने बिनशर्त भाजपाला पाठिंबा दिला. त्यामध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीतील उमेदवारांसाठी जाहीर सभा ही घेतल्या. निवडणुकीच्या दरम्यान भाजपाचे अनेक लोक राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटीही घेत होते.(Abhijit Panse)

दरम्यान आता या लोकसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद पदवीधर मतदारसंघाच्या (Konkan Graduate Constituency) निवडणुकीची तयारी सुरु झाल्याचे चित्र आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून कोकण पदवीधरसाठी अभिजित पानसे यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरविण्यात आले आहे.

याठिकाणी भाजपाचे निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती.
त्यामुळे याठिकाणी मनसे विरुद्ध भाजप असा सामना होणार की मनसेच्या उमेदवाराला महायुतीचा (Mahayuti) उमेदवार संबोधले जाणार हे लवकरच समोर येईल मात्र राजकीय वर्तुळात याची मोठी चर्चा सुरु झाली आहे.

पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची?

कोकण पदवीधरमधून मनसेने अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केली.
मात्र, आता पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची? असा सवाल उपस्थित झाला आहे.
कोकण पदवीधरमधून डावखरे हे भाजपचे आमदार आहेत.
त्यांचा कार्यकाळ संपतोय आणि त्याच जागेवर मनसेकडून अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
त्यामुळे आता ही उमेदवारी मनसेची की महायुतीची? असा सवाल उपस्थित झाला आहे.
कोकण पदवीधरसाठी येत्या २६ जून रोजी मतदान होणार आहे. तर १ जुलैला मतमोजणी होणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Branch Arrest Dr Ajay Taware | धक्कादायक! अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पलची अदलाबदल, क्राईम ब्रँचकडून ससूनमधील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांना अटक

Maharashtra SSC 10th Results 2024 | राज्याचा दहावीचा निकाल 95.81 टक्के; मुलींनी मारली बाजी, कोकण विभाग सर्वात पुढे, संपूर्ण मार्कशीट येथे पहा