लोकसभेच्या दालनात पहिलं पाऊल टाकल्यानंतर खा.डॉ. अमोल कोल्हेंनी ‘ही’ दिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – राज्यात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. तसेच लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर मोदी सरकारचेही पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. यंदाच्या लोकसभेत नव्याने निवडणूक जिंकून गेलेले अनेक खासदार पहिल्यांदा लोकसभेच्या दालनात पाऊल ठेवणार आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियाही महत्त्वाच्या आहेत. त्यात महाराष्ट्रातील शिरुर लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार अमोर कोल्हे यांनी पहिल्यांदाच लोकसभेच्या दालनात पाऊल ठेवले आहे. त्यावर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

देशाच्या सर्वोच्च सभागृहात पहिलं पाऊल टाकण्याचा एक वेगळाच अनुभव आहे, आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे. उत्सुकता आहे. सुनील तटकरेंसाठी हा स्कुल चेंज असल्यासारखे आहे. पण मी यात फ्रेशर आहे. त्यामुळे मनात आनंद, उत्सुकता आणि अभिमानही आहे, असं अमोल कोल्हेंनी म्हटलं. तसंच यावेळी त्यांनी जनतेचे आभार मानले. त्यांच्या अपेक्षांवर आपण खरे ऊतरू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

चित्रपट आणि राजकारण दोन्ही वेगवेगळ्या उंचीचे काम आहे. मात्र दोघांमध्ये एक समानता आहे ती म्हणजे जनतेचा विश्वास बसत नाही तोपर्यंत राजकारण काय आणि चित्रपट काय दोन्ही क्षेत्रात माणूस यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे येथे माझे काम आणि लोकांचा माझ्यावरील विश्वास अधिक महत्त्वाचा आहे, असं अमोल कोल्हेंनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारचे दुसऱ्या टप्प्यातील पहिले अधिवेशन आहे. यात नवनवीन चेहरे दिसणार आहेत. त्यामुळे त्यांचे कामकाज पाहण्यात तरूण वर्ग उत्सुक आहेच. तसंच याअधिवेशनात शेतकऱ्यांची बिकट अवस्थाबेरोजगारीदुष्काळजम्मू-काश्मीरमधील निवडणुका यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होईल, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे अधिवेशनातून जनतेसाठी चांगले निर्णय होऊ शकतात.

 

आरोग्यविषयक वृत्त –

केळीच्या सालीचे उपाय चकित करणारे, जाणून घ्या फायदे

अर्थरायटिसला दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
अपचनाच्या समस्येसाठी ‘वज्रासन’ फायद्याचे

सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ चेहऱ्यावर चुकूनही लावू नका