अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना २०१९ चा ‘मराठी विश्वभूषण पुरस्कार’ जाहीर 

ADV
मुंबई : वृत्तसंस्था – डॉ. अमोल कोल्हे यांना २०१९ चा ‘मराठी विश्वभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रयेक मराठी माणसाच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास पुन्हा एकदा सर्वांच्या डोळ्यासमोर मांडला आहे.

अमोल कोल्हे यांनी आपल्या अभिनयाने झी मराठी वाहिनीच्या माध्यमातून ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून शंभू राजे प्रत्येकापर्यंत पोहोचवले. या मालिकेत शंभू राजांची भूमिका साकारणारे अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांनी अपार कष्ट घेतले आहे. डॉ. अमोल कोल्हे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये वेगळाच उत्साह आहे. सगळ्याच स्तरावरून त्यांच कौतुक होत असून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देखील याबाबत डॉ कोल्हेंची भेट घेऊन कौतुक केलं आहे.

झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहचलेले. डॉ अमोल कोल्हे यांची मुलगी आद्याहिने देखील याच मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे आद्या कोल्हे ही या मालिकेत वडिलांसोबत स्क्रिन शेअर करत आहे. आद्याने मालिकेत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराची भूमिका साकारत आहे. सेटवरील शूटिंगचे काही फोटो शेअर करत आद्याच्या मालिकेतील पदार्पणाची माहिती डॉ अमोल कोल्हे यांनी काही दिवसापूर्वी दिली होती.