Dr. Mhaske Hospital & Research Center – Hadapsar, Pune | डॉ. म्हस्के हॉस्पिटलमध्ये एकाच छताखाली अत्याधुनिक सुविधा ! हडपसरमध्ये इंटीग्रेटेड सर्जिकल केअर सेंटरचे उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dr. Mhaske Hospital & Research Center – Hadapsar, Pune | पूर्व पुण्यात गेली ११ वर्ष आरोग्य सेवेत सतत कार्यरत असणारे आणि नेहमीच आपल्या रुग्णांसाठी अत्याधुनिक सुखसुविधा देण्याचा वसा घेतलेले डॉ. म्हस्के हॉस्पिटल (Dr. Mhaske Hospital) आणि रिसर्च सेंटर आहे, आमदार चेतन तुपे (MLA Chetan Tupe) , नोबल हॉस्पिटलचे (Noble Hospital Pune) मैनेजिंग डायरेक्टर डॉ दिलीप माने (Dr. Dilip Mane) यांच्या च्या हस्ते “इंटीग्रेटेड सर्जिकल केअर सेंटर “ चे उद्घाटन केले. रुग्णांना एकच छताखाली आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान सुविधा उपलब्ध होणार आहेत. (Dr. Mhaske Hospital & Research Center – Hadapsar, Pune)

नवनविन तंत्रज्ञान, नवनविन उपचार पद्धत या मुळे स्पेशीयलिटी सेवेची आजची गरज आहे . आणि ती ओळखून काळानुसार त्यात सुधारणा आणि बदल करणे हे महत्वाचे आहे “ अशी माहिती म्हस्के हॉस्पिटलचे मैनेजिंग डायरेक्टर डॉ.चेतन म्हस्के (Dr. Chetan Mhaske) यांनी दिली.

यूरोसर्जन, न्युरो सर्जन, ओंकोसर्जन, पेडियाक्ट्रिक सर्जन, ऑर्थो सर्जन, बॅरियट्रिक सर्जन आणि गॅस्ट्रो सर्जन असे सर्व या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध असतील.
याबरोबर काळाच्या गरजे नुसार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नवीन रुपाने संकेतस्थळ ( website) चे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
“ नवनविन सुविधांचा फायदा सर्व रुग्णांना होवून त्यामुळे उत्तम प्रकारे रुग्णसेवा होईल “अशी भावना – नोबल चे संचालक डॉ. दिलीप माने यांनी व्यक्त केली. (Dr. Mhaske Hospital & Research Center – Hadapsar, Pune)

हॉस्पिटल मधे आता

डॉ चेतन म्हस्के (लप्रोस्कोपिक सर्जन), डॉ अजय नाईक (पेडियाक्ट्रिक सर्जन),डॉ सुपर्ण खळदकर(युरोसर्जन),डॉ हृषिकेश देशमुख (युरोसर्जन),डॉ सतिष पटनशेट्टी (बेरियाक्ट्रिक / लठ्ठ पणासर्जन),डॉ आनंद काटकर (न्यूरो सर्जन),डॉ महेश पवार (ओंको सर्जन),डॉ रोहन मस्के (ऑर्थोपेडिक सर्जन)
हे तज्ञ येथील आयएससीसी सेंटर ला ओपीडी साठी उपलब्ध असणार आहेत.

आधुनिक तंत्रज्ञान मशीन परदेशातून आयात करावे लागतात, त्यामुळे वैद्यकीय उपचार महागडे झाले आहेत, एकाच छताखाली सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम डॉ. चेतन म्हस्के यांनी साकारला, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन आमदार चेतन तुपे पाटील यांनी केले.

माफक आणि उत्तम अशी सेवा देणारे डॉ. चेतन म्हस्के यांच्याकडूनअत्याधुनिक उत्तम सेवा होत राहील या शब्दांत डॉ. सुपर्ण खळदकर यांनी व्यक्त केली .
नरेंद्र पवार सीईओ राजदीप इंजी. सिस्टम, नोबेल हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक एच.
के. साळे यांनीही या नवीन सुरु झालेल्या उपक्रमाला शुभच्छा दिल्या .
खासदार डॉ अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) , काही अपिरिहार्य कारणास्तव या
कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही तरीही त्यांनी शुभेच्छा संदेश देऊन डॉ.म्हस्के
व सर्व टीमचे अभिनंदन केले पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमचे सूत्रसंचालन
डॉ.अमित तुपे (Dr. Amit Tupe) यांनी केले. आभार डॉ. चेतन म्हस्के यांनी आभार मानले.

Web Title :  Dr. Mhaske Hospital & Research Center – Hadapsar, Pune
| All facilities under one roof at Mhaske Hospital! Inauguration
of Integrated Surgical Care Center in Hadapsar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यात माणुसकीचे दर्शन ! 32 वर्षानंतर घडवून आणली आई आणि मुलांची भेट

Former MP Amar Sable | अंधाऱ्या काळोखात पांढऱ्या प्रकाशाची रेघ ओढावी,
त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या जीवनात महाडचा सत्याग्रह करून
प्रकाशाची वात पेटवली – माजी खासदार अमर साबळे

Chandrakant Patil | सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता

CSK Team Update | IPL सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू टीममधून बाहेर