Dr. Narendra Dabholkar Murder Case | अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतील 5 आरोपींवर आज आरोप निश्चित; ‘त्यांना’ मात्र गुन्हा कबूल नाही

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Dr. Narendra Dabholkar Murder Case | महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी (Dr. Narendra Dabholkar Murder Case) आज पाचही आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहे. मात्र आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमधील अडचणींमुळे औरंगाबाद कारागृहात (Aurangabad Jail) असलेला सचिन अंदुरे (Sachin Andure), आणि आर्थर रोड कारागृहात (Arthur Road Jail) असलेला शरद कळसकर (Sharad Kalaskar) या दोघांना पुण्यातील येरवडा कारागृहात (Yerwada Jail) हलविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आरोपींना गुन्हा कबुल नसल्याने त्यावर आता 30 सप्टेंबरला सरकार व बचाव पक्षातर्फे पुराव्यासंबंधीची कागदपत्रे सादर केली जाणार आहेत.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर (Additional Sessions Judge S. R. Navander) यांच्या न्यायालयापुढे ही सुनावणी झाली. कोरोनाचे कारण सांगून आरोपींनी वकील व नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी आरोप निश्चितीस पुन्हा मुदत देण्याची विनंती न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने मुदतवाढ देण्यास नकार देत आरोप निश्चिती झाली असून, गुन्हा कबूल आहे की नाही, अशी विचारणा आरोपींना केली. त्यावर आरोपींनी गुन्हा कबूल नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

या प्रकरणातील आरोपी सचिन अंदुरे, विरेंद्रसिंह तावडे (Dr. Virendrasinh Tawde), शरद कळसकर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीसाठी हजर होते, तर आरोपी संजीव पुनाळेकर (Adv. Sanjeev Punalekar ) व विक्रम भावे (Vikram Bhave) प्रत्यक्ष उपस्थित होते. सीबीआय तर्फे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी (CBI Special Public Prosecutor Prakash Suryavanshi) आणि बचाव पक्षातर्फे वीरेंद्र इचलकरंजीकर (Virendra Ichalkaranjikar) यांनी कामकाज पाहिले.

या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या दोषारोपपत्रात आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे (Dr. Virendrasinh Tawde), सचिन अंदुरे, शरद कळसकर यांच्याविरोधात आरोपींवर कट रचणे, हत्या करणे, बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपी अ‍ॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर पुरावे नष्ट करणे आदी आरोप ठेवण्यात आले आहेत.

Web Titel :- Dr. Narendra Dabholkar Murder Case | pune dabholkar murder pune court frames charges all five accused plead not guilty

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

OLA Electric Scooter New Price | ओलाच्या ‘ई-स्कुटर’च्या किमतीत कपात; ऑक्टोबरपासून रस्त्यावर धावणार

MP Supriya Sule | ‘या’ आयपीएस अधिकार्‍यानं घेतली खासदार सुप्रिया सुळेंची भेट

Pune Crime | शिरुरमध्ये मद्यपी एसटी बस चालक आणि वाहकाचं ‘डांगडिंग’,सर्वत्र खमंग चर्चेला उधाण; जाणून घ्या प्रकरण